मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /ऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'

ऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'

ऑपरेशन 'ऑल आऊट'मुळे खोऱ्यात दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळं अतिरेकी संघटना खवळल्या असून त्यांनी आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी 'मेगा प्लान' तयार केलाय.

ऑपरेशन 'ऑल आऊट'मुळे खोऱ्यात दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळं अतिरेकी संघटना खवळल्या असून त्यांनी आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी 'मेगा प्लान' तयार केलाय.

ऑपरेशन 'ऑल आऊट'मुळे खोऱ्यात दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळं अतिरेकी संघटना खवळल्या असून त्यांनी आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी 'मेगा प्लान' तयार केलाय.

  संदीप बोल,प्रतिनिधी, नवी दिल्ली,ता.15 ऑगस्ट : भारतीय लष्कराच्या ऑपरेशन 'ऑल आऊट'मुळे खोऱ्यात दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. लष्कराने अतिरेक्यांची हिट लिस्ट तयार करून त्यांचा खात्मा केलाय. त्यामुळं अतिरेकी संघटना खवळल्या असून त्यांनी आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी 'मेगा प्लान' तयार केलाय. गुप्तचर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातल्या दहशतवादी मोऱ्हक्यांचे अनेक नातेवाईक काश्मीर खोऱ्यात दाखल झाले असून हिंसाचाराची योजना आखत आहेत. अतिरेक्यांच्या या हालचालींमुळे लष्करही सावध झालं असून कुठल्याही तयारीसाठी सज्ज असल्याचं लष्कराच्या सुत्रांनी स्पष्ट केलंय.

  २०१४ ते २०१८ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असा होता मोदींचा स्टायलिश लूक

  पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाला आघाडी मिळाली. इम्रान खान 18 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. निकालाच्या दिवशी केलेल्या भाषणात इम्रान खान यांनी भारतासोबत शांतता आणि सौहार्द पाहिजे असं मत व्यक्त करत चर्चेची तयारी दर्शवली होती. आणि नवीन पाकिस्तानची निर्मिती करण्याची घोषणाही केली होती. मात्र वस्तुस्थिती त्याच्या उलट असून पाक लष्कराचं अतिरेकी संघटनांना फुस देणं सुरूच आहे. या अतिरेकी संघटनांना भारताविरूद्ध भडकावणं आणि रसद पुरवढा करणं हे लष्कर गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. इम्रानच्या पाकिस्तान तेहेरिक ए इन्साफ या पक्षाला लष्काराचा पाठिंबा आहे असं पाकिस्तानात उघडपणे बोललं जातं. तर अनेक अतिरेकी संघटनांना लष्कारानेच निवडणूकीच्या मैदानात उतरवलं होतं.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील १५ ठळक मुद्दे

  जैश ए मोहम्मद या कडव्या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचा पुतण्या मोहम्मद उमेर हा काश्मीरात आला आहे अशी माहितीही गुप्तचर सुत्रांनी दिली. भारतीय लष्कराच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी हे अतिरेकी संघटना योजना तयार करण्याचं काम करत असून सुरक्षा दलांनी जास्त सावध राहिलं पाहिजे असं मत लष्कराच्या कारवाई विभागाचे माजी प्रमुख ले.जन.विनोद भाटिया यांनी व्यक्त केलं. उमेर हा इतर दोन अतिरेकी कमांडरसोबत काश्मीर खोऱ्यात प्रवेश करण्यास यशस्वी झाला.

  Independence Day 2018: २०१३ सारखं काम करत राहिलो तर १०० वर्ष लागतील, मोदींनी भाजप- काँग्रेस सरकारची केली तुलना

  तो इथं नव्या तरूणांची संघटनेत भरती करणार असून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करणार आहे अशी माहिती गुप्तचर सुत्रांनी दिलीय. पाकव्याप्त काश्मिरात अतिरेक्यांच्या लाँचिंग पॅडवर जोरदार हालचाली सुरू असल्याचं लष्कराला आढळून आल्या आहेत. कश्मीरात मोठ्या हल्ल्याची तयारी अतिरेकी करत असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. तर घुसलेल्या अतिरेक्यांना ठार करण्याची चांगली संधी लष्कराकडे आहे त्यामुळे लष्कर आता आपली कारवाई आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे.

  First published:

  Tags: Indian army, ISI, Jammu and kashmir, Opreation all out, Pakistan, Pok, Terrorist organizations