URI नंतरचा सर्वात मोठा हल्ला, काश्मीर हाय अलर्टवर; तालिबानी आणि ISIS पॅटर्नने केला हल्ला

URI नंतरचा सर्वात मोठा हल्ला, काश्मीर हाय अलर्टवर; तालिबानी आणि ISIS पॅटर्नने केला हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात 10हून अधिक जवान शहीद झाले आहेत.

  • Share this:

पुलवामा, 14 फेब्रुवारी: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात 20हून अधिक जवान शहीद झाले आहेत. तर 40 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलिस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वाचा: पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, 10 जवान शहीद

7 आणि 14ला दिला होता अलर्ट

याआधी गुप्तचर विभागाने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 7 किंवा 14 तारखेला हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती. पुलवामामध्ये सीआरपीएफवर झालेला हा पहिला हल्ला नाही. याआधी एक वर्षापूर्वी 15 फेब्रुवारी 2018 रोजी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कॅम्पवर हल्ला केला होता. तेव्हा दहशतवाद्यांनी कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता.

असा झाला हल्ला

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्यांवर IEDद्वारे हल्ला केला. प्राथमिक अंदाजानुसार हा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांकडून झालेला हा सर्वात भीषण असा हल्ला होता. अशा प्रकारचे हल्ले तालिबानी अथवा ISISकडून केले जातात. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांनी यापुढेही अशाच प्रकारचे हल्ले केले जातील असा इशारा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी या परिसराची पाहणी केली होती. सीआरपीएफच्या कोणत्या गाड्या कधी बाहेर पडणार याची दहशतवाद्यांना पूर्ण माहिती होती. अशा प्रकारे हल्ले करणारे लोक काश्मीरमध्ये असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. साधारणपणे जैशे-ए-मोहम्मद सारख्या संघटनाच अशा प्रकारे IED हल्ले करते.


पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा भीषण हल्ला, ग्राऊंडवरून पहिला VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या