जम्मू-कश्मीर: त्राल सेक्टरमध्ये 3 दहशतवादी ठार, 19 दिवसांत 35 जणांचा खात्मा

जम्मू-कश्मीर: त्राल सेक्टरमध्ये 3 दहशतवादी ठार, 19 दिवसांत 35 जणांचा खात्मा

दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक संपली असून भारतीय सुरक्षा दलाने आजूबाजूचा परिसर घेरला आहे आणि अजूनही शोध मोहीम सुरू आहे. खरंतर या वर्षी अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 26 जून : शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir)त्राल सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांशी (Indian security force) झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा करण्यात आला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक संपली असून भारतीय सुरक्षा दलाने आजूबाजूचा परिसर घेरला आहे आणि अजूनही शोध मोहीम सुरू आहे. खरंतर या वर्षी अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या 19 दिवसांत 35 दहशतवादी ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रास सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसले असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. हे दहशवतवादी मोठा घात करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी टीम तयार करून परिसरात छापा मारला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

एसटी मंडळात 18 दिवसांचं धक्कादायक वास्तव; अश्लील चाळे, शरीरसुखाची मागणी आणि....

गोळीबार ऐकताच भारतीय सैनिकांनीही गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पुलवामा इथं दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका आठवड्यात पाच दहशतवादी ठार झाले आहेत.

महाराष्ट्रातील शहीद वीरपुत्रांवरून शिवसेनेची भाजपवर जहरी टीका, म्हणाले...

19 दिवसांत ठार झाले 35 दहशतवादी

जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. गेल्या 19 दिवसांत 35 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर यावर्षी सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये 110 दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये 125 अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्याचा कट तयार केल्याचं वृत्त आहे.

Coronavirus in India: 24 तासांत कोरोनाचा कहर, आजची धक्कादायक आकडेवारी समोर

संपादन - रेणुका धायबर

First published: June 26, 2020, 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading