News18 Lokmat

शाळेमध्ये भीषण स्फोट, 17 विद्यार्थी गंभीर जखमी

मीडिया रिपोर्टनुसार, शाळेमध्ये दहावीचे विद्यार्थी होते. जखमी विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू असून आता पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 13, 2019 03:39 PM IST

शाळेमध्ये भीषण स्फोट, 17 विद्यार्थी गंभीर जखमी

जम्मू-कश्मीर, 13 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये एका खाजगी शाळेत मोठा स्फोट झाल्याची बातमी सध्या हाती येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुलवामाच्या काकपोरा परिसरात एका शाळेच्या आतमध्ये मोठा स्फोट झाला आहे.

या धमाक्यामध्य 17 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या शाळेचं नाव फलाही-ई-मिलात आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे.

जमखी विद्यार्थ्यांना पुलवामाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाकडून आणखी विद्यार्थ्य़ांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

शाळेमध्ये नेमका कोणत्या कारणामुळे स्फोट झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, शाळेमध्ये दहावीचे विद्यार्थी होते. जखमींवर सध्या उपचार सुरू असून आता पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

सुदैवाने या स्फोटात अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी आता शालेय शिक्षकांची आणि व्यवस्थापनाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

Loading...

तर शाळेमध्ये अशा पद्धतीने स्फोट होणं म्हणजे हा शाळेचा भोंगळा कारभार असल्याची टीका आता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 03:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...