सरकार स्थापनेची स्वप्न बघणाऱ्या शिवसेनेला धक्का, पवारांसोबतच्या बैठकीआधी सोनिया गांधी यांना पत्र

सरकार स्थापनेची स्वप्न बघणाऱ्या शिवसेनेला धक्का, पवारांसोबतच्या बैठकीआधी सोनिया गांधी यांना पत्र

पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीपूर्वीच पाठवलेल्या या पत्रामुळे सोनिया गांधी यांच्यावर दबाव आणण्यात येत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसचे अंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी 10 जनपथ वरील निवासस्थानी पोहोचले आहेत. पण त्यापूर्वी जमियत उलेमा-ए-हिंदने सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. शिवसेनेला पाठिंबा नको असं या पत्रातून सोनिया गांधी यांना सांगण्यात आलं आहे. पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीपूर्वीच पाठवलेल्या या पत्रामुळे सोनिया गांधी यांच्यावर दबाव आणण्यात येत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

खरंतर राज्यातील सत्ता स्थापनेचा मार्ग काढण्यासाठी पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीला मोठं महत्त्व आहे. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवारांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्रिपदावरून भाजप सोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा पर्याय निवडला. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सत्ता वापटासंदर्भात चर्चा सुरु आहे. राज्यातील शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होणार का यासंदर्भात आज (सोमवार) दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक होणार आहे. आज दिल्लीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. पण पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा गोंधळ आणखी वाढणार असेच दिसत आहे.

इतर बातम्या - महशिवआघाडीचं सरकार आलं तरच जिल्ह्याचा पॅटर्न बदलणार, काँग्रेसच्या नेत्याचं विधान

राज्यातील सरकार स्थापने संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेलाच विचारा असे उत्तर शरद पवारांनी दिले. इतक नव्हे तर सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु आहे का याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, कसली चर्चा, कोणाशी चर्चा. पवारांच्या या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार अशी चर्चा आहे. असे असताना पवारांनी मात्र असे काही सुरुच नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना-भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली आहे. ते वेगळे आहेत आणि आम्ही व काँग्रेस वेगळे आहोत. त्यांनी त्यांचा मार्ग निवडायचा आम्ही आमचे राजकारण करू, असे पवार म्हणाले.

आज पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. ही चर्चा प्रामुख्याने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात असू शकते असे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2019 05:32 PM IST

ताज्या बातम्या