जालना, 17 मार्च : जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार रावसाहेब दानवेंना दिलासा मिळाला आहे. तर अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलेलं नाही, तर लक्ष्य बदललं असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे.