जालना, 30 नोव्हेंबर : एखादा गुन्हा करण्यासाठी कोण कशाचा वापर करेन, हे सांगता येत नाही. अशीच एक घटना जालना जिल्ह्यात उघड झाली आहे. चहाच्या टपरीच्या नावाखाली चक्क गांज्याची विक्री केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार देऊळगाव राजा रोडवरील दर्शननगर परिसरात उघडकीस आला आहे. जालना तालुका पोलिसांनी छापा टाकून 43 हजाराच्या गांज्यासह दोन भावांना अटक केली आहे.
दर्शननगर येथील या चहाच्या टपरीवर गांजाची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, नायब तहसीलदार निकम, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांनी फौजफाट्यासह त्याठिकाणी धाड टाकली.
हेही वाचा - 'मुळशी'तील तरुणांशी राडा, जीव वाचण्यासाठी पिस्तुल घेऊन फिरत होता तरुण, पण...
त्यावेळी घेतलेल्या झडतीमध्ये चारपायी बाजेवर वाळण्यासाठी घातलेला 4 किलो 200 ग्रॅम ओला गांजा आणि एका प्लास्टिक पिशवीत 95 ग्रॅम वाळलेला गांजा आढळून आला आहे.
या कारवाईत एकूण 42 हजार 950 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून संदीप राऊत (30) आणि आकाश राऊत (26) या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे.