News18 Lokmat

'...अन्यथा शिवसेना भवनाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेन'

दानवेंच्या विरोधात खोतकर निवडणूक न लढल्यास आम्ही शिवसैनिक युतीचा धर्म पाळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2019 05:07 PM IST

'...अन्यथा शिवसेना भवनाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेन'

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 14 मार्च : जालन्याची लोकसभा निवडणूक अर्जुन खोतकरांनी लढवावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना परवानगी द्यावी अन्यथा आपण शिवसेना भवनाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करू, असा ईशारा कैलास पुंगळे या जालन्यातील कट्टर शिवसैनिकानं दिला आहे.

कैलास पुंगळे हे जिल्हा परिषद सदस्य असून ते कट्टर शिवसैनिक आणि अर्जुन खोतकरांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांवरती खोट्या तक्रारी आणि गुन्हे दाखल करून नाहक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, दानवेंच्या विरोधात खोतकर निवडणूक न लढल्यास आम्ही शिवसैनिक युतीचा धर्म पाळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

'जालना का खासदार कैसा हो, अर्जुन खोतकर जैसा हो' शिवसैनिकांचा ठिय्या

जालन्याची जागा भाजपला न सोडता या जागेवर अर्जुन खोतकरांनीच लोकसभा लढवावी यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. यासाठी शिवसैनिकांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं. खोतकरांनी लोकसभा लढावी यासाठी आम्ही 2 वर्षांपासून कामाला लागलो आहे.

Loading...

हेही वाचा : कोणाला मिळाली राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी, ही आहे संपूर्ण यादी

मात्र, आता जर खोतकरांनी जालन्यातून लोकसभा लढवली नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशाराच शिवसैनिकांनी दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना भवनातून आत्महत्या करू असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या ठिय्या आंदोलनावेळी रावसाहेब दानवेंविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जालन्यातील खोतकर विरूद्ध दानवे वाद सर्वश्रुत आहे. त्यात युतीची घोषणा झाल्यानंतर खोतकरांनी दानवेंना जालन्यातून उमेदवारी देण्यावरून वारंवार नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या नेत्याचं भाकित, 'खोतकर 2 लाख मतांनी जिंकतील'

शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंमधल्या वादामुळे जालन्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे. खोतकरांच्या प्रचंड विरोधानंतरही दानवेंचं नाव निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत. मराठवाड्यात समन्वयाची जबाबदारी अर्जुन खोतकरांवर सोपवल्याचंही बोललं जात होतं.

मात्र, जालना मतदारसंघ भाजपला सुटल्याची माहिती केवळ मीडियावरच ऐकल्याचं म्हणत खोतकरांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तर खोतकर हे 2 लाख मतांनी विजयी होतील पण त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे असं काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार म्हणाले होते.


सुजयपासून ते शरद पवारांपर्यंत काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2019 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...