हातावरील मेंदी उतरण्याआधीच तरुणीचा खून, एकतर्फी प्रेमातून भरबाजारात संपवलं

हातावरील मेंदी उतरण्याआधीच तरुणीचा खून, एकतर्फी प्रेमातून भरबाजारात संपवलं

मनाला सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे मंठा शहरात एकच खळबळ माजली आहे.

  • Share this:

जालना, 30 जून : अवघ्या चार दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं... लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आली आणि बाजारात खरेदी करीत असताना एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून त्या नवविवाहितेचा भरबाजारात गळा चिरून तिचा खून केला. मंठा शहरातील बाजारपट्ट्यात भरदिवसा आज ही भयंकर घटना घडली आहे. मनाला सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे मंठा शहरात एकच खळबळ माजली आहे.

मंठा शहरात राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीचा 4 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतर ही नवविवाहिता पहिल्यांदाच आज माहेरी परतली होती. दरम्यान, काही खरेदी करण्यासाठी ती मंठ्यातील बाजारपट्ट्यात गेली असता एक माथेफिरू इसम तिथे आला आणि काही काही कळण्याच्या आतच त्याने आपल्या हातातील धारदार चाकूने त्या नवविवाहितेचा गळा चिरला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सदर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून नवविवाहितेच्या खूनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - पुण्यात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडात खळबळजनक खुलासा, लहान भाऊच निघाला आरोपी

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांगर आणि पोलीस निरीक्षक निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसंच आरोपीच्या शोधात पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 30, 2020, 8:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading