मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /जालना एटीएसचे हवालदार रशीद शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर

जालना एटीएसचे हवालदार रशीद शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर

स्वतंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील उत्कृष्ट सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे.

स्वतंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील उत्कृष्ट सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे.

स्वतंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील उत्कृष्ट सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : जालना येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार रशीद रहीम शेख यांना उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल यावर्षीचे राष्ट्रपती सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांचा गौरव होणार आहे.

स्वतंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील उत्कृष्ट सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या अधिकारी-कर्मचारी यांची आज यादी जाहीर करण्यात आली आहे. जालना येथे दहशतवादी विरोधी पथकात कार्यरत असलेले रशीद रहीम शेख यांचा पदक जाहीर झालेल्या लोकांमध्ये समावेश आहे.

रशीद शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखा विशेष कृती दल यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

दरम्यान, भारताच्या फाळणीचा दिवस म्हणजे 14 ऑगस्ट. याच दिवशी 1947 साली भारताची फाळणी (Partition of India) होऊन पाकिस्तान (Pakistan) या नव्या देशाची निर्मिती झाली. भारताच्या फाळणीचा इतिहास रक्तरंजित आहे. या फाळणीमध्ये हजारो लोकं मारली गेली, तसंच लाखो जणांना आपलं घर-दार सोडून अंगावरच्या कपड्यासह विस्थापित व्हावं लागलं. फाळणीच्या या कटू आठवणीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चांगलेच भावुक झाले आहेत.

केवळ धारावी नाही अख्ख्या मुंबईने जिंकला लढा,संपूर्ण मुंबापुरी कंटेनमेंट झोन फ्री

पंतप्रधानांनी ट्विट करत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा केली आहे. या कृतीमुळे देशातील भेदभावाचे विष कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

First published: