मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जळगाव : गावातील पाणी पुरवठ्यासाठी महिलांनी अडवला पाणी पुरवठा मंत्र्यांचा कार, लगेच कारवाईच्या सूचना

जळगाव : गावातील पाणी पुरवठ्यासाठी महिलांनी अडवला पाणी पुरवठा मंत्र्यांचा कार, लगेच कारवाईच्या सूचना

Minister Convoy stopped by womens कोरोना सारख्या माहामारीत गावात पाणीपुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ महिला संतप्त झाल्या होत्या. त्यांनी थेट पाणीपुरवठा मंत्र्यांसमोरच त्यांच्या अडचणी मांडल्या. त्यामुळं गावातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

जळगाव, 29 मे : जळगावमध्ये (Jalgaon) पाण्याच्या मुद्द्यावरून महिलांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांचा ताफा अडवला. जिल्ह्यातील मुक्ताईनगर (muktainagar) तालुक्यातल्या उचंदा गावातील महिलांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं पाटील यांचा ताफा अडवला. गावातील पाण्याची समस्या पाटील यांच्यासमोर मांडत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. त्यानंतर पाटील यांनी महिलांच्या तक्रारीची दखल घेत लगेचच कारवाईच्या सूचना दिल्या.

(वाचा-नंदुरबार : गेल्या वर्षीच्या तुलनेत कुपोषित वाढले, पण पोषण केंद्रांकडे फिरवली पाठ)

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळं अनेक घरं उध्वस्त झाले आहेत. त्यात केळी पिकाचंदेखिल मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. वादळी वाऱ्यामुळं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. संबंधित नुकसानीची माहिती घेऊन, पंचनामे करून पुढी प्रक्रिया करण्याच्या सूचनादेखिल देण्यात आल्या. अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्याचीही पाहणी गुलाबराव पाटील यांनी केली.

(वाचा-"उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं")

नुकसानीची पाहणी करून गुलाबराव पाटील यांचा ताफा परत निघाला. त्यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील उचांदा गावातून गुलाबराव पाटील यांचा ताफा जात होता. मात्र गावातील संतप्त महिलांनी ताफा अडवत गावात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. कोरोना सारख्या माहामारीत गावात पाणीपुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ महिला संतप्त झाल्या होत्या. त्यांनी थेट पाणीपुरवठा मंत्र्यांसमोरच त्यांच्या अडचणी मांडल्या. त्यामुळं गावातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

ग्रामीण भागातील पाण्याची समस्या पाहता अनेकदा महिलांना अडचणींचा सामना करवा लागत असतो. या गावातील महिलांना समस्या मांडण्याची आयती संधी मिळाली. तीही पाणीपुरवठा मंत्र्यांसमोर. मग त्यांनी या संधीचं सोन करत आपल्या मागण्या मांडल्या.

First published: