चायना मोबाईल जीवावर बेतला, बॅटरीच्या स्फोटामुळे मुलाचा मृत्यू

पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2018 09:57 PM IST

चायना मोबाईल जीवावर बेतला, बॅटरीच्या स्फोटामुळे मुलाचा मृत्यू

जळगाव, 18 जून : जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील गोरक्ष खाटीक हा तेरा वर्षीय विद्यार्थी मोबाईल बॅटरीच्या स्फोटामुळे गंभीर रित्या भाजला होता. १५ दिवस मृत्यूशी झुंज देऊन अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मोबाईल चार्जिंग लावून बराच वेळ होऊन सुद्धा मोबाईल चार्जिंग झाला नव्हता. त्यामुळे त्याने मोबाईलची  बॅटरी काढून पुन्हा चार्जिंग ला लावताच मोबाईलचा झालेल्या स्फोटामध्ये गोरक्ष खाटीक हा तेरा वर्षीय मुलगा गंभीररित्या भाजला गेला होता.

 नसतं साहस कशासाठी ? सेल्फी काढण्याच्या नादात अजगरानं घातला विळखा

सुरुवातीच्या काळात त्याच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्याला मुंबई येथे जेजे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्याचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला.

मालाड स्टेशनवर धावत्या लोकलसमोर तरुणाने घेतली उडी, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्हीत

पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चायना कंपनीच्या मोबाईलमुळे हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना आता सावधानता बाळगणं गरजेचं बनलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 09:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close