कोल्हापूरजवळ भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले जळगावचे माजी महापौर

जळगाव शहराचे माजी महापौर व विद्यमान सभागृह नेते ललित कोल्हे यांच्या वाहनाला शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. सुदैवाने वेळेवर एअर बॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला. ललित कोल्हे कोल्हापूर जाताना त्यांच्या कारला अपघात झाला.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 02:47 PM IST

कोल्हापूरजवळ भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले जळगावचे माजी महापौर

राजेश भागवत, (प्रतिनिधी)

जळगाव, 10 ऑगस्ट- जळगाव शहराचे माजी महापौर व विद्यमान सभागृह नेते ललित कोल्हे यांच्या वाहनाला शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. सुदैवाने वेळेवर एअर बॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला. ललित कोल्हे कोल्हापूर जाताना त्यांच्या कारला अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ललित कोल्हे हे आपल्या खासगी कामासाठी कारने (एम.एच.04 जी.जे.9924) सहकारी मित्रांसोबत कोल्हापूरला जात होते. कोल्हापूरजवळ भरधाव वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरेगेटला धडकली. सुदैवाने कारमधील एअरबॅग उघडल्याने ललित कोल्हे आणि त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले. कोणालाही इजा झाली नाही. कोल्हे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताबाबत माहिती जाणून घेण्यासाठी कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Loading...

घर की तलाव कळेना, कोल्हापुरातल्या गावातील पुराची भीषणता दाखवणारा ग्राऊंड REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2019 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...