कच्ची मेथी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

कच्ची मेथी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

कीटकनाशकाची फवारणी केलेली मेथीची कच्ची भाजी खाल्ल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील अंजूबाई पाटील नामक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

जळगाव, 4 डिसेंबर - कीटकनाशकाची फवारणी केलेली मेथीची कच्ची भाजी खाल्ल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या आव्हानी गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

आव्हाणी गावातल्या रहिवाशी अंजूबाई पाटील या त्यांच्या गतीमंद मुलासह गावात राहतात. पतीच्या निधनानंतर उपजीविकेचं कोणतंही साधन नसल्याने त्या गावात मिळेल त्या शेतात मोल-मजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावातील आणखी काही महिलांसोबत त्या गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतात भेंडी तोडणीच्या कामासाठी गेल्या होत्या. भेंडी सोबतच घरच्या भाजीसाठी म्हणून शेतमालकाने थोड्या प्रमाणात मेथी देखील पेरली आहे. भेंडी तोडण्याचं काम करणाऱ्या या महिला जेवणाची वेळ होताच शेतातच जेवायला बसल्या. जेवणाच्या वेळेस कच्या मेथीची भाजी तोंडी लावायला घेतली होती आणि काम संपल्यावर काहींनी घरी सुद्धा कच्ची मेथी नेली.

मात्र, शेतमालकाने चार दिवसापूर्वी भेंडीवर फवारणी केल्यामुळे त्याचा फवारा मेथीवर देखील पडला असल्याने शेत मालकाने मजूर महिलांना मेथीची भाजी न खाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून काही महिलांनी मेथीची भाजी पाण्याने धुऊन कच्ची खाणे पसंत केले. मात्र, अंजना बाई काहीशा वेंधळ्या स्वभावाच्या असल्याने त्यांनी ती भाजी न धुताच खाल्ली असावी, असा त्यांच्या सोबतच्या महिला आणि नातेवाईकांचा कयास आहे. न धुता मेथीची भाजी खाल्ल्यामुळे अंजूबाईंना रात्रीच्या वेळेस उलट्या आणि जुलाब सुरु झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पहाटे अंजूबाईंची ढासळलेली प्रकृती लक्षात आल्यानंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या पश्ताच त्यांचा गतिमंद मुगला असून, त्याचं कोण करणार असा प्रश्न आत निर्माण झाला आहे.

 VIDEO VIRAL : लाजिरवाणी घटना; वळुला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

First published: December 4, 2018, 8:11 PM IST

ताज्या बातम्या