मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जळगावात ओवेसींची एंट्री, एमआयएमने जिंकल्या 3 जागा

जळगावात ओवेसींची एंट्री, एमआयएमने जिंकल्या 3 जागा

आंध्रची सीमा ओलांडून एमआयएम नांदेडमध्ये दाखल झाला आणि तिथून थेट महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला पण आता या पक्षाने थेट उत्तर महाराष्ट्रात एंट्री केलीये.

आंध्रची सीमा ओलांडून एमआयएम नांदेडमध्ये दाखल झाला आणि तिथून थेट महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला पण आता या पक्षाने थेट उत्तर महाराष्ट्रात एंट्री केलीये.

आंध्रची सीमा ओलांडून एमआयएम नांदेडमध्ये दाखल झाला आणि तिथून थेट महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला पण आता या पक्षाने थेट उत्तर महाराष्ट्रात एंट्री केलीये.

    जळगाव, 03 आॅगस्ट : आंध्रची सीमा ओलांडून एमआयएम नांदेडमध्ये दाखल झाला आणि तिथून थेट महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला पण आता या पक्षाने थेट उत्तर महाराष्ट्रात एंट्री केलीये. जळगाव महापालिका निवडणुकीत एमआयएमने खातं उघडलं असून पहिल्यांदाच तीन जागा पटकावल्या आहे. खासदार असाउद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन 2012 साली नांदेड महापालिका निवडणुकीतून महाराष्ट्रात एंट्री केली होती. त्यानंतर लातूर, औरंगाबाद आणि मुंबई पालिकेसह विधानसभेत धडक मारली. पण आता उत्तरमहाराष्ट्रात पहिल्यांदाच एमएआयएमने खातं उघडलंय. एमआयएमचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. काँग्रेसकडून मुस्लिमबहुल भागात उमेदवारांनी तिकीटं देण्यात आली होती. तर याचा भागात एमआयएमच्या तिकीटावर उमेदवारांनी आपलं नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरले होते. प्रभाग क्र.१८ मधून बागवान रियाज अहमद अब्दुल करीम, देशमुख सुन्नाबी राजू , शेख सैईदा युसुफ  या तीन उमेदवारांनी निवडणूक लढवली होती आणि हे तिन्ही उमेदवार विजयी होत एमआयएमला खातं खोलून दिलं. पण एमआयएमची उत्तर महाराष्ट्रात एंट्री जरी घेतली असली तरी पुढे पाठ मागे सरसपाट अशीच अवस्था आतापर्यंत पालिका निवडणुकीत एमआयएमची झाली आहे. ज्या नांदेड महापालिकेतून एमआयएमने एंट्री घेतली होती त्याच नांदेड पालिका निवडणुकीत मागील वर्षी एमआयएमचा सुपडासाफ झाला होता. तसंच मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आपले मुस्लीम मतदार पक्षांसोबत ठेवण्यास यश मिळालं. पक्षाला या निवडणुकीत २.५५ टक्के म्हणजे १ लाख २७ हजार ७४० मतं मिळाली होती. एमआयएमनं ५९ उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. त्यातल्या कित्येक जणांचे डिपाॅझिटही जप्त झाले. सर्वाधिक मुस्लिम उमेदवार हे काँग्रेसचे विजयी झाले होते. जळगावात काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. याचा फायदा नक्कीच एमआयएमला झालाय. काँग्रेसला मतदान न करणाऱ्या मतदारांनी एमआयएमच्या पारड्यात आपली मतं टाकलीये. भाजपची एकहाती सत्ता दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने 57 जागांवर निर्विवाद आघाडी घेतली आहे. भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास या निकालावरून स्पष्ट झालंय. या निकालामुळे जळगावातील सुरेश जैनांचं राजकीय साम्राज्य एकाच दणक्यात खालसा झालंय. या निवडणुकीत सुरेश जैनांनी प्रथमच आघाडीचा सवतासुभा बाजुला ठेऊन शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुका लढल्या तरीही तरीही त्याचा त्यांना काहीच राजकीय फायदा झाला नाही. बरेच दिवस जेलमध्ये राहिल्याने त्यांना जळगावकरांची सहानुभूती मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण झालं उलटचं, गिरीश महाजनांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन प्रथमच महापालिकेची सत्ता काबीज केल्याच जमा आहे. महाजन 'राज' जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेचा सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दिलाय. महाजनांच्या या विजयामुळे खडसेंची अस्वस्था वाढलीये. काँग्रेसचा सुपडासाफ . भाजपने सर्वाधिक 57 जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल सुरू केलीय. मात्र, मागील निवडणुकीत चौथ्या स्थानावर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रचार सभा घेतली होती. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांने प्रचाराकडे पाठ फिरवली होती. याचाच फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने 11 जागा जिंकल्या होत्या. त्याआधी त्यांना भोपळा फोडावा लागला होता. आता पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाट्याला अपयश आलंय. हेही वाचा Jalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्य Jalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग  Jalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ  Jalgaon Corporation election 2018 : जळगावात 'कमळ' उमललं, सुरेशदादांना धक्का

    LIVE : सांगलीच्या निकालात टि्वस्ट, काँग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपची आघाडी

    First published:

    Tags: BJP, Girish mhajan, Jalgaon corporation election 2018, Jalgaon election, Jalgaon election 2018, Jalgaon municipal corporation election 2018, MIM, असाउद्ददीन ओवेसी, एमआयएम

    पुढील बातम्या