News18 Lokmat

सराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'!

दसऱ्याच्या मुहूर्तापूर्वीच सोन्याचे भाव दोनशे रुपयांनी वाढल्यामुळे मंगळवारी सोन्याचा भाव 32 हजार 400 रूपयांवर जाऊन पोहोचला.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2018 10:04 PM IST

सराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'!

जळगाव, 16 ऑक्टोबर : सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावातील सराफ व्यावसायिक दसऱ्याच्या मुहूर्तावर कॅश करण्याच्या तयारीत आहेत. त्याला करणही तसंच आहे. दसऱ्याच्या मुहूर्तापूर्वीच सोन्याचे भाव दोनशे रुपयांनी वाढल्यामुळे मंगळवारी सोन्याचा भाव 32 हजार 400 रूपयांवर जाऊन पोहोचला. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे दर वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्याही दरांवर होतोय. सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

डॉलरच्या तुलनेत रुपयांचे दर कमी जास्त होत असल्याने सोन्या-चांदीच्या दरातही अस्थिरता निर्माण झाली असल्याने त्यांचे भाव सातत्याने वाढत आहेत. याचा परिणाम जळगावच्या सराफ बाजारावर झालेला दिसून येत आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचा भाव प्रति तोळा 32 हजार 400 रुपये झाला आहे. सणासुदीच्या पार्शवभूमीवर हे भाव अजून वधारणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

सततच्या या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्याचा परिणाम बाजारात जाणवत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कच्च्या तेलाचे द सर्वत्र मोठा परिणाम होत असून सोने-चांदीवरही तो जाणवत असल्याचे जाणकारांनी सांगितले. सततच्या भाव वाढीमुळे विक्रीवर परिणाम होत असला तरी दसरा आणि दिवाळी निम्मित सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पाऊले बाजारपेठेकडे वळताहेत. ग्राहकांना भाव कमी होण्याची प्रतिक्षा असली तरी त्यात वाढ होण्याचीच जास्त शक्यता असल्याची प्रतिक्रिया जळगावचे सुवर्ण व्यापारी सुशिल बाफना यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

 PHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2018 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...