जैसलमेर, 13 मार्च : राजस्थानच्या जैसलमेर सीमा भागात भारत-पाकिस्तान सीमेजवळ 2 मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. तर याच परिसरातून 2 लढाऊ विमान गेल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या हवाई दलाकडून पुन्हा एकदा भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पूंछ सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळवर मंगळवारी रात्री पाकिस्तानचे दोन लढाऊ विमान दिसले होते. पूंछ सेक्टरमध्ये विमानाचे आवाज होत असल्याचंही सांगण्यात येत आहे.
Pak jets went supersonic while flying over PoK last night, Indian air defence systems on alert
भारताच्या रडाराने पाकिस्तानची 2 लढाऊ विमाने भारतीय सीमेजवळ फिरत असल्याचं टिपलं. या घटनेनंतर भारतीय हवाई दलाला हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसंच भारतीय रडार सिस्टमदेखील हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे.
बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या तळावर भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. पाकिस्तान हवाई दलाचे एफ-16 लढाऊ विमान 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हद्दीत घुसले होते. तेव्हा भारतीय हवाई दलाच्या जवानांनी मोठ्या साहसाने पाकिस्तानचे विमान पाडले होते. ते विमान पाकिस्तान सीमेच्या 3 किलोमीटर आत लाम घाटी येथे पाडण्यात आले होते.
कारला धडकून तो हवेत उडाला, मुंबईतील थरारक अपघाताचा LIVE VIDEO