राजस्थानात सीमेवरील 90 किमी परिसरात हाय अलर्ट, पाकने तैनात केले सैन्य

राजस्थानमधील स्थानिक सांगतात, 1965 आणि 1971 च्या युद्धावेळीही अशीच परिस्थिती होती.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 04:17 PM IST

राजस्थानात सीमेवरील 90 किमी परिसरात हाय अलर्ट, पाकने तैनात केले सैन्य

पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकने राजस्थानला लागून असलेल्या सीमेवरील गावातील नागरिकांना इतरत्र हलवलं आहे.

भारतीय सीमेला लागून असलेल्या 10 ते 15 किलोमीटर परिसरातील गावांत सतर्कतेचे आदेश दिले असून दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची भीतीने गाळण उडाली आहे. त्यांनीही सीमेवर सैनिक तैनात केले आहेत.

भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकने काश्मीरमध्ये विमान घुसवण्याचा प्रयत्न केला. याला भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. गंगानगर सीमावर्ती भागात सैन्यासह जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading...

सीमेवरील सुरक्षा दलांसोबत पोलिसांनी समन्वय साधावा असं प्रशासनाने सांगितलं आहे. बीएसएफच्या अतिरिक्त तुकडीला सीमेवर पाठवण्यात आलं आहे.

जैसलमेर सीमेवर पाकिस्तानकडून आगळीक केली जाण्याच्या शक्यतेने लष्कर सतर्क झाले आहे.  सीमावर्ती भागातील लोकही भारतीय सैन्याला मदत करत आहे.

सीमेवरील गावांमध्ये लष्कर पोहचले आहे. तसेच गावातील लोकांना आपत्कालिन स्थितीत बाहेर पडण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आलं आहे.

सीमावर्ती भागातील जेष्ठ नागरिक सांगतात की, 1965 आणि 1971 च्या युद्धावेळीही अशीच परिस्थिती होती. कोणत्याही परिस्थितीत आम्ही लष्कराच्या सोबत आहोत असं तनोट गावातील सरपंचांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...