जयपूर 12 फेब्रुवारी : जयपूरच्या महापौर (Mayor) डॉ. सौम्या गुर्जर यांनी कामाप्रती माणसाची किती आस्था असू शकते हे दाखवून दिलं आहे. प्रसूतीच्या (Delivery) काही तास अगोदरपर्यंत त्या काम करत होत्या. गुरुवारी पहाटे 5 वाजून 14 मिनीटांनी त्यांनी मुलाला जन्म दिला. परंतु बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्या काम करत होत्या. गुरुवारी सकाळी ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली. 'काम हाच देव. जयपूर ग्रेटर महापालिका ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत मी काम करत होते. रात्री साडेबारा वाजता वेदना सुरू झाल्यानंतर कुकून हॉस्पिटलमध्ये भरती झाले. देवाच्या कृपेनं पहाटे 5 वाजून 14 मिनिटांनी आम्हाला मुलगा झाला. बाळ आणि मी दोघंही उत्तम स्थितीत आहोत', असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
7 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी भाजप कार्यालयाला भेट दिली होती. त्या वेळी IANS शी संवाद साधताना डॉ. सौम्या म्हणाल्या होत्या, ‘गर्भधारणेच्या (Pregnency) काळात काम करणं खरंच रोमांचक आणि आव्हानात्मक आहे. या काळात काम करताना मी माझ्या वेदना देखील विसरून जाते. 30 जानेवारीला त्यांचा गर्भारकाळ पूर्ण होणार होता. परंतु या दिवशी देखील त्या काम करत होत्या.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत महात्मा गांधी राजस्थान आरोग्य विमा योजनेचा त्यांनी शुभारंभ केला होता. याचबरोबर महापालिकेचा अर्थसंकल्प देखील सादर केला होता. महत्त्वाचं म्हणजे मागील महिन्यापासून त्या विविध कार्यक्रमांना देखील हजेरी लावत होत्या.
दरम्यान, गर्भवती असताना देखील जयपूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रचार करणाऱ्या सौम्या यांचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे. याचबरोबर नवीन युगातील स्त्री (New Age Woman) म्हणून शुभेच्छाचे संदेश देखील येत आहेत. पदावर असताना मुलाला जन्म देणाऱ्या त्या राजस्थानमधील पहिल्या महापौर ठरल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jaipur