ठाणे : मनसेची दहीहंडी 'जय जवान'ने फोडली!

ठाणे : मनसेची दहीहंडी 'जय जवान'ने फोडली!

ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दहा थर लावणाऱ्या पथकाला 21 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

  • Share this:

 

ठाणे, 03 सप्टेंबर : जगभरात मुंबईतल्या दहीहंडीची चर्चा होते ती पथकांकडून रचण्यात येणाऱ्या उंचच्या उंच मानवी मनोऱ्यासाठी.... गेल्या वर्षी काही पथकानं 9 मानवी मनोरे रचून विक्रम केला होता. त्यामुळं यावेळी अनेक आयोजकांनी पथकांना दहा थर रचण्याचं आव्हान दिलंय. पण हे आव्हान कुणालाही पेलता आलं नाही. जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने नऊ थर लावून ठाण्यातील मनसेची दहीहंडी फोडली.

ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दहा थर लावणाऱ्या पथकाला 21 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यामुळे ठाण्यात मनसेचे दहीहंडी कोण फोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं. दरवर्षी नऊ थरांचा विक्रम करणाऱ्या जोगेश्वरीच्या जयजवान गोविंदा पथकाने 10 थर लावण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. दोन वेळा प्रयत्न केले पण त्यात त्यांना अपयश आले. अखेर नऊ धर रावून मनसेची दहीहंडी फोडली. 10 थर न लावता आल्यामुळे 11 लाखांचे बक्षीस मिळाले. विशेष म्हणजे 9 थर लावण्याचा विक्रम जय जवान गोविंदा पथकाकडे कायम आहे.

सकाळीच जय जवान मंडळानं 9 थर रचून स्वतःच्याच विक्रमाची बरोबरी केली होती. तर दादरमध्ये साईराम मंडळाकडून 8 थरांची सलामी देण्यात आली होती.

आता ठाण्यातच भाजप नेते शिवाजी पाटलांच्या स्वामी प्रतिष्ठाननं 10 थर लावणाऱ्या पथकाला 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. त्यामुळे जयजवान इथंही 10 थर लावून ही दहीहंडी फोडतं का हे पाहण्याचं ठरणार आहे.

दरम्यान, दहीहंडीच्या या थरांचा थराथराट एका गोविंदाच्या जीवावर बेतला आहे. धारावीतील 20 वर्षांच्या कुश खंदारे या गोविंदाचा मृत्यू झालाय. सायन रुग्णालयात अकुशला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचाराआधीच त्याचा मृत्यू झालाय. फीड येऊन पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

==============================================================================

दादरच्या या दहीहंडीचा थरार तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल!

First published: September 3, 2018, 7:09 PM IST

ताज्या बातम्या