चक्क जग्वारने लॉन्च केली मेड इन इंडिया रेंज रोवर, किंमत एकदा पाहाच..

चक्क जग्वारने लॉन्च केली मेड इन इंडिया रेंज रोवर, किंमत एकदा पाहाच..

जग्वारची रेंज रोवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) ने भारतीय बनावटीची Range Rover Velar हा कार लाँच केली. रेंज रोव्हरची किंमत ही 72.47 लाखांपासून सुरू होतो. ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. जग्वार लँड रोव्हर (JLR) चं R Dynamic S हे व्हर्जन पूर्णतः भारत तयार करण्यात आलं असून ते 15 ते 20 टक्के स्वस्त आहे, असं कंपनीची म्हणणं आहे.

सेकंडहँड गाड्यांच्या मार्केटमध्ये झगमगाट; स्वस्तात खरेदी करता येईल तुम्हाला BMW आणि फॉर्च्‍यूनर

सेफ्टीसाठी SUV मध्ये आहेत 6 एअरबॅग्स

जग्वारच्या रेंज रोव्हर वेलर मध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 6 एअरबॅग्स आणि एक अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टिम देण्यात आली आहे. याशिवाय इमरजेंसी ब्रेक आणि अडाप्टिव्ह क्रूज कंट्रोल सारखं फीचर देण्यात आलं आहे. यात व्हील ड्राइव्ह सिस्टिम, फोर कॉर्नर एअर सस्पेंशन असे फीचर्ससुद्धा आहेत. कंपनीने भारतीय बनावटीच्या 3 इंजिन ऑप्शनमध्ये Velar लाँच केली आहे. वेलरचं केबिन CBU मॉडल सारखं आहे. यात एम्बिएंट लाइटिंग, स्लाइडिंग पॅनोरामिक सनरूफ, फोर-झोन क्लाइमेट कंट्रोल आणि 10-इंचाचा ड्युएल टचस्क्रीन देण्यात आला आहे.

Mothers Day निमित्त आईला द्या गिफ्ट; उत्तम फीचर्स आणि स्वस्तात मिळताहे ‘हे’ 5 फोन

डिझेल इंजिनमध्ये 179hp, 2.0 लीटर आणि 3.0 लीटर असे व्हेरिएंट आहेत. या करला 100 किलोमीटरचा वेग घेण्यासाठी 6.7 सेकंद लागतात. या गाडीमध्ये (ATPC) सिस्टम आहे जी इलेक्ट्रॉनिक्स कॉन्फिगर करते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2019 06:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading