बहुप्रतीक्षित 'जग्गा जासूस'च्या प्रदर्शनाला अखेर मिळाला मुहूर्त

बहुप्रतीक्षित 'जग्गा जासूस'च्या प्रदर्शनाला अखेर मिळाला मुहूर्त

  • Share this:

25 मे : बॉलिवूडचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'जग्गा जासूस' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सुरुवातीला 'जग्गा जासूस' 7 एप्रिल 2017 ला प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर 14 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

'जग्गा जासूस'चं नवं पोस्टर लाँच करण्यात आलं असून त्यात सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांनी 'जग्गा जासूस' मध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाचा टीझर व ट्रेलर गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच रिलीज करण्यात आला होता. परंतु अनुराग बासु प्रोजेक्टबाबत असमाधानी असल्याने नंतर या सिनेमाचं री-शुटिंग करण्यात आलं. त्यामुळे रणबीर-कॅट जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आतुर झालेल्या चाहत्यांसाठी ही नक्कीच दिलासा देणारी बातमी आहे.

अनुराग बासु व रणबीर हे एकत्र काम करत असलेला हा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्यांनी बर्फीमध्ये एकत्र काम केलं होत. तर कॅटरिना पहिल्यांदाच बासुंच्या सिनेमात काम करतेय.

या सिनेमाची कथा गुप्तहेर असलेल्या 'जग्गा' भोवती फिरते,जो आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. सिनेमात  याच जग्गाच्या भुमिकेत रणबीर दिसणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 11:53 AM IST

ताज्या बातम्या