तेलुगू देसम पार्टी केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर, टीडीपीच्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे

तेलुगू देसम पार्टी केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर, टीडीपीच्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे

भाजप काय प्रतिक्रिया देतं ते आम्ही आधी बघू, आणि मग पुढचा निर्णय घेऊ, असं नायडूंनी काल पत्रकार परिषद घेून स्पष्ट केलं.

  • Share this:

08 मार्च : चंद्राबाबू नायडूंचा टीडीपी पक्ष केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडला आहे. टीडीपीच्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी आज सकाळी राजीनामे दिले. हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांनी राजीनामा दिलाय.

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्यानं नायडूंनी हे पाऊल उचललंय. सध्या आम्ही एनडीएतून बाहेर पडत नाहीये, सरकारला आमचा बाहेरून पाठिंबा असेल.. भाजप काय प्रतिक्रिया देतं ते आम्ही आधी बघू, आणि मग पुढचा निर्णय घेऊ, असं नायडूंनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणं शक्य होणार नाही असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र आंध्राला विशेष पॅकेज देण्याची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे. पण जर आमच्या समस्या सुटणार नसतील तर केंद्रात राहण्यात काय अर्थ आहे असा सवालही चंद्रबाबू नायडूंनी विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बाहेर पडण्याची धमकी दिल्यानंतर सत्तारूढ भाजपाने आंध्रच्या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवले होते. यापूर्वी रालोआची सत्ता असलेल्या राज्यांच्या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जात होते. पण त्यावेळी ते अन्य कामात गुंतलेले असल्याने आंध्रच्या भावनांना आवर घालण्यासाठी स्वत: व्यंकय्या नायडू परिषदेत उपस्थित राहिले. यावेळी व्यंकय्या नायडूंनी चंद्रबाबूंशी चर्चा केली आणि चर्चेचा वृत्तांत पंतप्रधानांना कळवला. त्यानंतर चंद्रबाबू नायडूंची समजूत घालण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांना पाठवले होते. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही.

पाहूयात टीडीपीच्या मागण्या काय आहेत आणि त्यावर केंद्रानं काय उत्तर दिलं...

1. टीडीपी - 16 हजार कोटींची वित्तीय तूट

केंद्र सरकार - 4 हजार कोटी दिले आहेत.

2. टीडीपी - विशेष दर्जाचं आश्वासन दिलं होतं

केंद्र सरकार - शक्य नाही, केंद्रीय योजनांमध्ये अधिक वाटा उचलू

3. टीडीपी - अमरावती शहरासाठी 33 हजार कोटींची गरज

केंद्र सरकार - 2,500 कोटी दिले आहेत.

4. टीडीपी - पोलावरम सिंचन प्रकल्पाचा संपूर्ण खर्च (33.000 कोटी) केंद्रानं करावा

केंद्र सरकार - 5 हजार कोटी दिले आहेत, उरलेले नंतर

5. टीडीपी - इतर प्रकल्पांसाठी हुडको, नाबार्डनं निधी द्यावा

केंद्र सरकार - वर्ल्ड बँकेकडून कर्ज मिळवून देऊ

पाहूयात भाजपवर याचा कसा परिणाम होणार आहे ते... 

- आंध्रमध्ये टीडीपी भाजप - लोकसभेच्या 17 जागा

- आंध्रमधल्या लोकांच्या भावना भाजपनं दुखावल्या, नायडूंचा दावा

- 2014मध्ये काँग्रेसबाबत अशीच भावना

- तामिळनाडू, केरळमध्ये भाजपचं अस्तित्व नगण्य

- कर्नाटकात सध्या काँग्रेसचं सरकार

- म्हणजेच, 2019मध्ये युती झाली नाही तर दक्षिणेत भाजपचं मोठं नुकसान

टीडीपी भाजपवर नाराज

- केंद्रात टीडीपीचे 2 मंत्री

- नागरी हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू

- विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री सृजना चौधरी

- लोकसभेत 16 खासदार

- राज्यसभेत 4 खासदार

- आंध्र प्रदेश विधानसभेत 175 पेकी 127 आमदार टीडीपीचे

- आंध्र प्रदेश विधानसभेत भाजपचे 4 आमदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2018 09:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading