काँग्रेसला मोठा झटका, 'या' नेत्याने उचलला नाही पवारांचा फोन!

काँग्रेसला मोठा झटका, 'या' नेत्याने उचलला नाही पवारांचा फोन!

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हलचाली सुरु झाल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हलचाली सुरु झाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार असला तरी त्याआधी दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेतृत्वाखालील युपीए बरोबरच तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले नाही तर विरोधकांना सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते. यासाठी प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

युपीएमधील एक महत्त्वाचा पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांना फोन केला. पण रेड्डी यांनी पवारांचा फोनच घेतला नाही. पवारांनी निकालानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रेड्डींना फोन केला होता. ज्या अर्थी रेड्डींनी फोन घेतला नाही त्याचा स्पष्ट अर्थ असाच होतो की रेड्डी यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.

23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालाच्या आधी रेड्डी कोणत्याच आघाडीत किंवा पक्षासोबत जाण्यास उत्सुक नाहीत. विशेष म्हणजे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर रेड्डी यांनी ही भूमिके निश्चित केली आहे. अधिकतर एक्झिट पोलमध्ये वायएसआर काँग्रेसला टीडीपी पेक्षा अधिक जागा मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. जर निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागला तर रेड्डी यांचे महत्त्व वाढणार याची त्यांना देखील कल्पना आहे.

वायएसआरमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारांना जगन मोहन यांच्याशी बोलायचे होते. पण जगन त्यासाठी तयार नाहीत. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत जगन कोणाशीही चर्चा करणार नाहीत.

युपीएमध्ये येतील का दोन विरोधक एकत्र?

काँग्रेस टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांना सोबत ठेवण्यास उत्सुक आहे. अशातच युपीएच्या वतीने पवारांनी रेड्डींना फोन केला. याचा अर्थ काँग्रेस गरज पडल्यास नायडूचे विरोधक असलेल्या रेड्डी यांना देखील सोबत घेऊ शकतील. सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर नायडू सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्याच आठवड्यात नायडू यांनी दोन वेळा दिल्लीत पवारांची भेट घेतली होती. रेड्डींना आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच काँग्रेसला नायडू यांच्या सोबतचे संबंध बिघडवायचे नाहीत. त्यामुळेच रेड्डी यांच्याशी बोलण्याची जबाबदारी पवारांकडे सोपवली आहे.


भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 12:07 PM IST

ताज्या बातम्या