जॅकलिन फर्नांडिस झाली ‘मिसेस सिरिअल किलर’

जॅकलिन फर्नांडिस झाली ‘मिसेस सिरिअल किलर’

गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडची फर्नांडिस मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

  • Share this:

मुंबई, २४ एप्रिल- जगभरातच फक्त नेटफ्लिक्सची क्रेझ आहे असं नाही. भारतातही याचा फार मोठा चाहता वर्ग आहे. तरुणाई टीव्ही आणि सिनेमांपेक्षा मोबाइल सीरिजकडे वळली आहे. याचमुळे मनोरंजनाची माध्यमंही बदलली आणि पर्यायाने अर्थकारणही बदललं.

काळाची गरज ओळखून सैफ अली खान, विकी कौशल, राधिका आपटे यांसारखे कलाकार वेब- सीरिज करण्याला प्राधान्य देतात. आता या यादीत जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही समावेश झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडची फर्नांडिस मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण लवकरच तिच्या चाहत्यांनी ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. नेटफ्लिक्स ओरिजनलवर ती मिसेस सीरिअल किलर या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

तब्बल 27 वर्षांनी शाहरुख खानचं होणार पदार्पण, या सिनेमात साकारणार खलनायक

नेटफ्लिक्सची ही थ्रिलर वेब सीरिज शिरीष कुंदर दिग्दर्शित करणार आहे तर त्याची बायको फराह खान या सीरिजची निर्मिती करणार आहे. टायटलमुळे सीरिजचा विषय काय असणार याची कल्पना येते. या सीरिजमध्ये जॅकलिन एक विवाहीत तरूणी दाखवण्यात आली आहे. तिच्या नवऱ्याला खूनाच्या आरोपाखाली अटक केलेली असते.

'दयाबेन'च्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीची निवड, लवकरच दिसणार नवी 'मिसेस गाढा?'

नवऱ्याला वाचवण्यासाठी ती खऱ्याखुऱ्या सीरिअल किलरसारखी खून करत असल्यासारखं दाखवते, अशा धाटणीची कथा या सीरिजची आहे. या वर्षाच्या अखेरीस ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. २०१८ मध्ये सलमान खानच्या रेस ३ मध्ये ती शेवटची दिसली होती.

तुमच्या घरातली भांडणं तर माझ्यामुळेच कमी होत असतील, मोदींचा अक्षयला चिमटा

जॅकलिनच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती ड्राइव्ह सिनेमात दिसणार आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती करण जोहर करत असून जॅकलिनसोबत या सिनेमात सुशांत सिंह राजपुत, विक्रमजीत विर्क आणि सपना पब्बी यांची मुख्य भूमिका आहे. गेल्या वर्षी ७ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता मात्र आता हा सिनेमा यावर्षी २८ जूनला प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारने विचारला असा काही प्रश्न की, हसायला लागले नरेंद्र मोदी

VIDEO: ...तेव्हा आंबा विकत घेण्याचीही ऐपत नव्हती - पंतप्रधान मोदी

First published: April 24, 2019, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading