News18 Lokmat

जबलपूरमधील मराठी बांधवांची व्यापारातही यशस्वी घोडदौड !

जबलपूरमधल्या मराठी उद्योजकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी तिथल्या मराठा उद्योजक संघाने येत्या 7 ऑक्टोबरला 'शिवनेरी' मेळाव्याचं आयोजन केलंय. तीन दिवस चालणाऱ्या या उद्योग प्रदर्शनात स्थानिक मराठी उद्योजकांना आपले स्टॉल्स लावता येणार आहेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2017 09:51 PM IST

जबलपूरमधील मराठी बांधवांची व्यापारातही यशस्वी घोडदौड !

जबलपूर. 2 ऑक्टोबर : मराठी माणूस हा उद्योगधार्जिणा नाही, असा आरोप नेहमीच होतो. पण जबलपूरमधल्या मराठी बांधवांनी हाच समज बऱ्यापैकी खोटा ठरवलाय. परमुलखातून येऊनही तिथल्या मराठी माणसाने व्यापार उदिमात बऱ्यापैकी जम बसवलाय. आजमितीला जबलपूरमध्ये साडेतीनशेच्यावर मराठी उद्योजक नावारुपाला आलेत. जबलपूरमधल्या याच मराठी उद्योजकांना एकाच व्यासपीठावर जमवण्यासाठी तिथल्या मराठा उद्योजक संघाने येत्या 7 ऑक्टोबरला 'शिवनेरी' मेळाव्याचं आयोजन केलंय. तीन दिवस चालणाऱ्या या उद्योग प्रदर्शनात स्थानिक मराठी उद्योजकांना आपले स्टॉल्स लावता येणार आहेत.

पाणिपत युद्धाच्या काळात उत्तरभारतात गेलेले बरचसे मराठी बांधव जबलपूरमध्येच स्थायिक झालेत. आजमितीला तिथल्या मराठी बांधवांची लोकसंख्या एक लाखाच्यावर आहे. एवढंच काय जबलपूरच्या महापौर स्वाती गोडबोले या देखील अस्सल मराठीच आहेत. याशिवाय शहराच्या व्यापारातही मराठी बांधवांनी चांगलाच जम बसवलाय. यासर्वांना हक्काचं व्यासवीठ मिळावं. या उदात्त हेतूनेच जबलपूर मराठा उद्योजक संघाने शिवनेरी मेळाव्याचं आयोजन केलंय. या तीन दिवसीय मेळाव्याला जबलपूरमधल्या मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन अर्चना मुठे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...