भाजपच्या कार्याध्यक्षपदी जे.पी. नड्डा, अमित शहांना नवा सोबती

महाराष्ट्र, हरियाना आणि इतर काही राज्यांमध्ये चार महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका हे नड्डांसाठी पहिलं मोठं आव्हान असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 09:28 PM IST

भाजपच्या कार्याध्यक्षपदी जे.पी. नड्डा, अमित शहांना नवा सोबती

नवी दिल्ली,17 जून :  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भाजपच्या कार्याध्यक्षपदी आज नियुक्ती करण्यात आली. अमित शहा यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना मदत म्हणून नड्डा यांची नियुक्ती करण्यात आलीय. अमित शहा हे आणखी सहा महिने अध्यक्ष म्हणून असतील असं भाजपने स्पष्ट केलंय. महाराष्ट्र, हरियाना आणि इतर काही राज्यांमध्ये चार महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका हे नड्डांसाठी पहिलं मोठं आव्हान असणार आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नड्डा हे अमित शहा आणि मोदींच्या विश्वासातले नेते म्हणून ओळखले जातात. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असल्याने एकाच व्यक्तीला दोन पदांवर राहता येत नाही. त्यामुळे ही नियुक्ती करण्यात आलीय. नड्डा यांची नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

कोण आहेत जे.पी. नड्डा?

भाजपचे हे 59 वर्षांचे नेते आणि राज्यसभेचे खासदार जे. पी. नड्डा पक्षाची रणनीती ठरवणारे महत्त्वाचे नेते आहेत. ते भाजपच्या संसदीय मंडळाचे सचिव आहेत. या लोकसभा निवडणुकीत जे. पी. नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने इथे जोरदार यश मिळवलं. उत्तर प्रदेशच्या 80 जागांपैकी भाजपला इथे 62 जागा मिळाल्या.



भाजपचे रणनीतीकार

भाजपचे हे 59 वर्षांचे नेते आणि राज्यसभेचे खासदार जे. पी. नड्डा पक्षाची रणनीती ठरवणारे महत्त्वाचे नेते आहेत. ते भाजपच्या संसदीय मंडळाचे सचिव आहेत. या लोकसभा निवडणुकीत जे. पी. नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने इथे जोरदार यश मिळवलं. उत्तर प्रदेशच्या 80 जागांपैकी भाजपला इथे 62 जागा मिळाल्या.

जे. पी. नड्डा यांचा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश केला गेलेला नाही. त्यामुळेच त्यांच्या खांद्यावर भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल, अशी शक्यता होती.



अमित शहा यांचा विश्वास

जे. पी. नड्डा हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विश्वासातले मानले जातात. अगदी कठीण प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवण्यात त्यांची ख्याती आहे. जे. पी. नड्डा हे मोदी आणि अमित शहा यांच्यासोबतच भाजपच्या शक्तिशाली त्रिमूर्तींमध्ये एक आहेत.

जेपी आंदोलन ते अभाविप

जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यातले. त्यांचा जन्म पाटण्यामध्ये 2 डिसेंबर 1960 ला झाला. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. बिहारमधल्या विद्यार्थी आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. त्यानंतर ते अभाविपमध्ये आले.

1977 मध्ये पाटणा विद्यापीठात विद्यार्थी सेनेच्या निवडणुकीत ते सचिव म्हणून निवडून आले आणि 13 वर्षं विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय राहिले.

जे. पी. नड्डा यांचं संघटनकौशल्य बघून त्यांना 1982 मध्ये हिमाचल प्रदेशच्या विद्यार्थी परिषदेचे प्रचारक बनवण्यात आलं. याचवेळी त्यांनी हिमाचल प्रदेश विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेश विद्यापीठात पहिल्यांदा विद्यार्थी सेनेची निवडणूक झाली आणि अभाविपला यात यश मिळालं. 1983 च्या सुमाराला जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेश विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले आणि 1986 पासून 1989 पर्यंत ते विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महासचिव होते.



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 08:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close