जे जे रूग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही कायम, हजारो रुग्णांचे हाल

जे जे रूग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही कायम, हजारो रुग्णांचे हाल

जेजे रूग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही कायम आहे. त्यामुळे गिरीश महाजन आणि संपकरी डॉक्टरांमधली बैठक निष्फळ झाली असं म्हणायला हरकत नाही.

  • Share this:

22 मे : जे जे रुग्णलातील निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशी सुद्धा सुरुच आहे. काल रात्री उशीरा वैद्यकीय संचालक डॉ प्रवीण शिनगारे, डॉ. तात्याराव लहाने, जेजे डीन सुधीर ननंदकर आणि निवासी डॉक्टर प्रतिनिधी यांच्यातील बैठक पार पडली.

या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या सुरक्षा संदर्भातील विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून जोपर्यंत या मागण्यांची पूर्तता रुग्णलयात प्रत्यक्षात होत नाही, तोपर्यंत हा संप सुरु राहणार आहे असं संपकऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

आज याबाबत निवासी डॉक्टर प्रतिनिधी सुरक्षेबाबत मागण्याची पूर्तता प्रत्यक्षात केली जाते का ? याबाबत आढावा घेऊन संप मागे घेण्याबाबत विचार करणार येणार आहे.

निवासी डॉक्टरांच्या या आहेत मुख्य मागण्या

- सुरक्षा संदर्भात सेक्युरिटी गार्ड वाढविण्यात यावेत

- प्रत्येक वार्डला एक सेक्युरिटी गार्ड असावा

- अलार्म सिस्टीमची पूर्तता लवकरात लवकर करून प्रत्येक ठिकाणी आलर्म सिस्टीम असावी

- त्यासोबतच हॉस्टेल बाबत प्रश्न सुद्धा या बैठकीत मांडण्यात आला आहे.

First published: May 22, 2018, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading