मुंबईत इटालीयन महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

मुंबई दर्शनसाठा आलेल्या इटालीयन महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलीसांनी अटक केली आहे. राकेश नंदी असं या व्यक्तीचं नाव आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2018 09:04 PM IST

मुंबईत इटालीयन महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

अक्षय कुडकेलवार, प्रतिनीधी मुंबई, 02 जुलै : मुंबई दर्शनसाठा आलेल्या इटालीयन महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलीसांनी अटक केली आहे. राकेश नंदी असं या व्यक्तीचं नाव आहे. मुंबईत 14 जूनला आलेल्या या महिलेवर नंदाने गाईड असल्याचे सांगून बलात्कार केला होता. मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रांचने नंदाच्या आज मुसक्या आवळल्या.

मुंबई फिरायला आलेल्या एका 37 वर्षीय महिलेवर स्वतःला गाइड म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं होतं. ही महिला मुळ इटलीची असून 11 जून रोजी ही बंगळुरूहुन मुंबई दर्शन करण्यासाठी आली होती.

त्यानंतर 14 जून रोजी गेट वे इंडिया बघून आल्यानंतर मुंबई दर्शन करण्यासाठी टॅक्सी किंवा बसच्या शोधात असताना स्वतः ला गाइड म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीच्या ती संपर्कात आली आणि संपूर्ण मुंबई दर्शन करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीने घेतली.

मात्र, त्याच दिवशी रात्री साडे 8च्या सुमारास त्या व्यक्तीने टॅक्सी बुक करून ती टॅक्सी जुहूजवळ एक वाइन शॉप जवळ थांबवली आणि त्या महिलेस जबरजस्ती करून तिच्या वर अतिप्रसंग केल्याचं महिलेने तिच्या तक्रारीत सांगितलं आहे.

त्यानंतर त्या महिलेने या व्यक्तीपासून आपली सुटका करून दक्षिण मुंबईत आपलं हॉटेल गाठली आणि दुसऱ्या दिवशी मुंबईहून बंगळुरूला आपण राहत असलेल्या आश्रमात गेली. त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीने तिला इंस्टाग्राम वर मेसेजेस करून पत्ता विचारून त्रास द्यायला सुरु केल्यानंतर तिने दिल्लीला जाऊन इटालियन दुतावासाची संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली.

Loading...

शुक्रवारी रात्री मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात आयपीसी 376(2) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा...

 हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर

 लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

 सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...