मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /भावाची शेवटची आठवण जपून ठेवलं पडलं महागात; अखेर तुरुंगात रवानगी

भावाची शेवटची आठवण जपून ठेवलं पडलं महागात; अखेर तुरुंगात रवानगी

भावाने मृत्यूसमयी त्या दोन गोष्टी सांभाळून ठेवण्यास सांगितलं होतं, मात्र...

भावाने मृत्यूसमयी त्या दोन गोष्टी सांभाळून ठेवण्यास सांगितलं होतं, मात्र...

भावाने मृत्यूसमयी त्या दोन गोष्टी सांभाळून ठेवण्यास सांगितलं होतं, मात्र...

लुधियाना, 16 जानेवारी : येथे एक अत्यंत विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने आपल्या भावाची शेवटची आठवण जपून ठेवली. मात्र परिणामी त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. एखाद्या व्यक्तीची शेवटची आठवण ती व्यक्ती सोबत नसतानाही कायम ती सोबत असल्याचा भास करुन देते. त्यात जर सख्खा भाऊ असेल तर अशी शेवटची आठवण खूप जपून ठेवली जाते. (The punishment was for keeping the last thing of the brother) मात्र भावाप्रती प्रेमाचा या तरुणाला मोठा दंड भरावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जस्सोगावमधील वरिंदपाल सिंह याच्या भावाने मृत्यूसमयी एक बेकायदेशीर पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं आपली शेवटची निशाणी म्हणून भावाकडे सोपवलं होतं. भावाची ही निशाणी तरुणाने एके ठिकाणी लपून ठेवली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई सुरू केली व वरिंदरपालला अटक केली. सांगितलं जात आहे की, या वस्तू वरिंदरपालच्या भावाने उत्तर प्रदेशातून आणले होते. (The punishment was for keeping the last thing of the brother)

हे ही वाचा-भयानक! पतीनं दारूच्या नशेत साथीदारांना सोबत घेत पत्नीबाबत केलं हे घृणास्पद कृत्य

त्याला चुकीची संगत लागली होती आणि तो नशाही करायला लागला होता. दोन वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. मात्र या वस्तू तो आपला भाऊ वरिंदरपाल याला शेवटची आठवण म्हणून देऊन गेला. (The punishment was for keeping the last thing of the brother) वरिंदरपालनेही या आठवणी सांभाळून ठेवल्या. परिणामी त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात केस दाखल करुन तुरुंगात पाठविण्यात आलं आहे.

First published:

Tags: Crime news