28 नोव्हेंबर, मुंबई : कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ आयटी विभागाच्या प्रधान सचिवांना अखेर भोवलाय. या विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची अखेर बदली करण्यात आलीय. कर्जमाफीचा हा सगळा ऑनलाईन घोळ समोर येताच म्हणजेच गेल्याच आठवड्यात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. पण त्यांनी त्यावेळी आपण वडिलांच्या प्रकृतीच्या कारणास्तव सुट्टी घेतल्याचा दावा केला होता. पण आज अखेर त्यांची आय विभागाच्या प्रधान सचिव पदावरून बदली झाल्याचं समोर आलंय.
विजयकुमार गौतम यांची आता वित्त विभागाच्या (लेखा आणि कोषागार) प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. त्यांच्या बदलीनंतर आयटी विभागाचा कार्यभार हा एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे देण्यात आलाय. खरंतर विजयकुमार गौतम सक्तीच्या रजेवर गेल्यापासूनच श्रीनिवासन आयटी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. त्यांची आता पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आलीय.
कर्जमाफीच्या ऑनलाईन लाभार्थी यादीत अनेक तांत्रिक चुका आढळून आल्यानेच कर्जमाफीची अमलबजावणी करताना अनेक अडचणी येताहेत. त्यामुळे सरकाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी वाढतेय. त्यांनतर सरकारने ही कारवाई केलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा