विवेक ओबेरॉय साकारणार PM MODI, ७ जानेवारीला येणार फर्स्ट लूक

विवेक ओबेरॉय साकारणार PM MODI, ७ जानेवारीला येणार फर्स्ट लूक

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधी माहिती दिली.

  • Share this:

मुंबई, ०४ जानेवारी २०१९- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारित द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर सिनेमानंतर आता अजून एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची मुख्य भूमिका साकारणार आहे.

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधी माहिती दिली. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका साकारणार आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन ओमंग कुमार आणि निर्मिती संदीप सिंग करणार आहे. येत्या ७ जानेवारी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात येणार आहे. जानेवारीमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.’

हा सिनेमा प्रदर्शित कधी होणार याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नसून पोस्टर प्रदर्शनाच्यावेळी सिनेमाचं नाव आणि प्रदर्शनाची तारीख कळेल अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.

ओमंगने २०१७ मध्ये स्टार बॉक्सर मेरी कॉमच्या जीवनावर आधारित बायोपिकचे दिग्दर्शन केले होते. प्रियांका चोप्राने या सिनेमात मेरी कॉमची भूमिका साकारली होती. यानंतर ओमंगने संजय दत्तच्या भूमी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तर क्रिश ३, ओमकारा, कंपनी आणि साथिया यांसारख्या सिनेमात काम केलेल्या विवेकवर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज

First published: January 4, 2019, 1:55 PM IST

ताज्या बातम्या