अक्षय कुमार पुन्हा एकदा वादात, ट्वीट LIKE केल्यानंतर मागावी लागली माफी

अक्षय कुमार पुन्हा एकदा वादात, ट्वीट LIKE केल्यानंतर मागावी लागली माफी

पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील हिंसाचारामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. इतकंच नाही तर #BoycotCanadianKumar या नावाचा ट्विटर ट्रेंडही होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : नागरिकता दुरुस्ती कायदा 2019 च्या (Citizenship Amendment Act 2019)विरोधात रविवारी जामिया नगर आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात हिंसाचारा (Jamia Millia Islamia University)च्या घटना घडल्या. या हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील हिंसाचारामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. इतकंच नाही तर #BoycotCanadianKumar  या नावाचा ट्विटर ट्रेंडही होत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनीही याला विरोध केला आहे. पण यात प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने मोठी चूक केली आहे आणि आता त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे.

अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवरून जामियामधील या हिंसाचाराची थट्टा करणारे एक ट्विट लाईक केलं. पण अक्षयला त्याची चूक समजताच त्याने लगेच ट्वीटवरून लाईक काढून टाकलं. अक्षयने त्यावर 'चूक' असंही म्हटलं आहे. एका ट्विटमध्ये त्याने लिहिलं की, 'जामिया मिलिया विद्यार्थ्यांशी संबंधित ट्विट माझ्याकडून चचुकून लाईक झालं. चुकून माझ्याकडून लाईकचं बटन दाबलं गेलं. मला हे समजताच मी लगेचच ते दुरुस्त केलं. कारण मी कोणत्याही प्रकारे हिंसेचे समर्थन करत नाही.

अक्षय या चुकीमुळे सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रोल झाला आहे. अक्षय कुमारने असं काही लाईक केल्यामुळे काही लोक प्रचंड नाराज झाले पण काहींनी मात्र त्याच्याकडून चूक झाल्याचं मान्य करत ट्वीट केलं. सध्या ट्विटरवर #ISupportAkshay असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: December 16, 2019, 4:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading