• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चांद्रयान-2 का झेपावलं नाही, पाहा खरं कारण!
  • VIDEO: चांद्रयान-2 का झेपावलं नाही, पाहा खरं कारण!

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 08:56 AM IST | Updated On: Jul 15, 2019 08:56 AM IST

    मुंबई, 15 जुलै : इस्रोच्या महत्वकांक्षी चांद्रयान-2चं प्रक्षेपण आज होऊ शकलं नाही. लाँच वेहिकलमध्ये ऐन वेळेला बिघाड झाल्यामुळे, खबरदारी म्हणून इस्रोनं प्रक्षेपण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. प्रक्षेपणाची नवी तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करू, अशी घोषणा इस्रोनं केली. आज पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी प्रक्षेपण अपेक्षित होतं. दरम्यान, क्रायोजेनिक इंधन लाँच वेहिकलमध्ये भरलं जात असताना तांत्रिक बिघाड आढऴला. हे इंधन बाहेर काढून रॉकेटचं सविस्तर निरीक्षण केलं जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला किमान 10 दिवस लागतील, अशा माहिती आयएएनएस वृत्तसंस्थेनं दिली आहे. पण, यावर इस्रोनं मात्र प्रतिक्रिया दिलेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी