• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: Chandrayaan-2चं प्रक्षेपण रद्द करण्याच्या कारणांचा ISROनं केला खुलासा
  • VIDEO: Chandrayaan-2चं प्रक्षेपण रद्द करण्याच्या कारणांचा ISROनं केला खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 03:24 AM IST | Updated On: Jul 15, 2019 03:24 AM IST

    श्रीहरीकोटा 15 जुलै : सर्व देशाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 मोहिमेचं आजचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलंय. प्रक्षेपणाला 56 मिनिटं आणि 24 सेकंद राहिले असताना काउंटडाऊन रोखण्यात आलं. काही तांत्रिक कारणांमुळे इस्रोने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. पहाटे 2 वाजून 51 मिनिटांची चांद्रयानाचं उड्डाण होणार होतं. मात्र क्रायोजिनिक इंजिनमध्ये इंधन भरताना काही तांत्रिक दोष आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने प्रक्षेपण रोखण्यात आल्याचं इस्रोने म्हटलं आहे. GSLV Mk-3 या बाहुबली प्रक्षेपकाच्या साह्याने 'चांद्रयान 2' आकाशात झेपावणार होतं. क्रायोजिनिक इंजिनमध्ये भरलेलं इंधन खाली केलं जाणार असून त्यानंतर रॉकेटची पुन्हा तपासणी होणार आहे. त्यासाठी किमान 10 दिवस लागणार आहेत. लवकरच नवी तारीख जाहीर करू असंही इस्रोने सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी