इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू मुंबई दाखल ; मुख्यमंत्र्यांनी केलं मराठमोळं स्वागत

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू मुंबई दाखल ; मुख्यमंत्र्यांनी केलं मराठमोळं स्वागत

इस्त्रालयचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे आजपासून मुंबई दौऱ्यावर आलेत. मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

  • Share this:

17 जानेवारी, मुंबई : इस्त्रालयचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे आजपासून मुंबई दौऱ्यावर आलेत. मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. नेत्यन्याहू यांचे उद्या मुंबईत भरगच्च कार्यक्रम आहेत. ते आडीच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या अध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत, १३० इस्रायली आणि २५० भारतीय उद्योजकांसमोर ते भाषणही करतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी हेही त्यांच्यासोबत दुपारी महाराष्ट्र-इस्रायल सहकार्यावर चर्चा करतील.

२६/११ च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि नरीमन हाऊसला भेट देऊन नऊ वर्षांपूर्वी आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या मोशे आणि त्याच्या कुटुंबीयांशीही ते बोलणार आहेत. 'शालोमबॉलिवूड' हा सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित केला असून यात बॉलिवूडमधले दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांनाही ते इस्त्रायलमध्ये आमंत्रित करणार असून मुंबईतूनच ते इस्त्राइलला जाणार आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2018 09:37 PM IST

ताज्या बातम्या