दमास्कस,ता.10 मे: सीरियातल्या युद्धाचं कारण देत आज इराण आणि इस्रायलने परस्परांच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमुळं सीरियातली परिस्थिती आणखी स्फोटक बनली आहे. गोलन हाईट्समधल्या काही लष्करी ठिकाणांवर इराणने 20 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली आहे.
इराणच्या रेव्ह्युलेशनरी ब्रिगेडने हे हल्ले केल्याची माहितीही इस्रायलनं दिली आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं सीरियातल्या इराणच्या काही ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. सीरियन सरकारची अधिकृत न्यूज एजन्सी 'सना' न्यूज ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इराणची शस्त्रास्त्र साठविण्याची ठिकाणं आणि सीरियन सरकारच्या सैन्य ठिकाणांवर हे हल्ले होते मात्र त्यातली काही क्षेत्रणास्त्र निकामी करण्यात यश आल्याचही सना ने म्हटलं आहे. सीरियातल्या सत्ताधारी बशर अल असाद सरकारला इराणचा पाठिंबा आहे. असाद हे शिया पंथीय असल्यानं जगातला एकमेव शिया देश असलेल्या इराणचा असाद यांना पाठिंबा आहे.
इराण असाद सरकारला शस्त्रपुरवढा आणि रसद पुरवतो तर अमेरिकेचा असाद यांना तीव्र विरोध आहे. कुठल्याही परिस्थितीत असाद यांनी पायउतार व्हावं असं अमेरिकेचं मत आहे. तर अमेरिकेला इस्रायलचा पाठिंबा आहे.
More than 20 rockets have been fired at Israel from Syria, Israel says https://t.co/Ii1w1pIVlr pic.twitter.com/hJ90bbdYEd
— CNN Breaking News (@cnnbrk) May 9, 2018