विंग कमांडर अभिनंदन यांना ISIनं केली होती मारहाण; 40 तास केलं टॉर्चर

विंग कमांडर अभिनंदन यांना ISIनं केली होती मारहाण; 40 तास केलं टॉर्चर

विंग कमांडर अभिनंदन यांना ISIनं 40 तास टॉर्चर केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मे : एअर स्ट्राईकनंतर भारताने पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडलं. त्यानंतर मिग – 21 क्रॅश झालं आणि पाकिस्तानच्या हद्दीत उतरलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं. भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली. यावेळी अभिनंदन यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही याचा व्हिडीओ पाकिस्ताननं जारी केला. पण, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. कारण, विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या ISIनं मारहाण केली होती. शिवाय, मानसिक त्रास देखील दिला होता अशी माहिती समोर येत आहे.


'...तर या कारणास्तव फक्त VVPATची मतं धरली जातील ग्राह्य'

काय केलं ISIनं?

विंग कमांडर अभिनंदन हे सुरूवातीला 4 तास पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. सैन्यानं त्यांना चांगली वागणूक दिली. त्यानंतर त्यांची ISIनं चौकशी केली. त्यांना मारहाण करत शिवीगाळ देखील केली. अभिनंदन यांनी भारतात परत आल्यानंतर सैन्य अधिकाऱ्यांसमोर आपला जवाब नोंदवला आहे. तब्बल 40 तास ISIनं त्यांची चौकशी केली. तसंच रॉशी संबंधित प्रश्न देखील केले.

ताब्यात घेतल्यानंतर ISI अभिनंदन यांना इस्लामाबादहून रावळपिंडी येथे नेण्यात आलं. 40 तास त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. बंदुकीन त्यांच्या डोक्यावर मारहाण देखील करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याला दुखापत देखील झाली.

विंग कमांडर यांनी स्वत:बद्दल काहीही माहिती दिली नाही तरी चालेल. कारण, भारतीय प्रसारमाध्यमांकडून ISIला अभिनंदन यांच्या कुटुंबाबद्दल माहिती मिळाली असल्यास ISIनं त्यांना सांगितलं.


ट्विटरवरील EXIT POLL बाबतचे ट्वीट हटवा; निवडणूक आयोगाचे आदेश

खोटा व्हिडीओ

विंग कमांडर अभिनंदन चहा पित असतानाचा व्हिडीओ हा खरा आहे. पण त्यानंतर 1 मिनिट 23 सेकंदाचा पाकिस्ताननं जारी केलेल्या व्हिडीओमधील आवाज त्याचा नसल्याची माहिती अभिनंदन यांनी केली. व्हिडीओला 15 कट असल्याचं यापूर्वीच सिद्ध झालेलं आहे.


पुलवामातील 3 दहशतवाद्यांच्या एन्काउंटरनंतरचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 12:30 PM IST

ताज्या बातम्या