'या' कारणामुळे सलमान खान आहे अजूनपर्यंत सिंगल

'या' कारणामुळे सलमान खान आहे अजूनपर्यंत सिंगल

सलमानच्या लग्नाची सर्वांना आतुरता आहे. पण आता सलमानच्या लग्नाविषयी नवी माहिती समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानच्या लग्नाची आतुरता जेवढी त्याच्या कुटुंबाला आहे तेवढीच त्याच्या चाहत्यांनाही आहे. सर्वांना नेहमीच सलमान लग्न कधी करणार असा प्रश्न पडलेला असतो. पण आता सलमानच्या लग्नाविषयी नवी माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, सलमान इतर कोणापेक्षा आपल्या कुटुंबीयांवर सर्वाधिक प्रेम करतो. त्यामुळे तो इतर कोणाला त्यांच्या एवढं महत्त्व देऊ शकत नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार सलमान त्याच्या घरातील सर्व सदस्यांवर निस्वार्थ प्रेम करतो, आपल्या कुटुंबीयांव्यतिरिक्त सलमान दुसऱ्या कोणावरही तेवढं प्रेम करू शकत नाही.  सलमानच्या मते, आपल्या जोडीदाराला बचन देणं आणि त्यानंतर त्याला तेवढा वेळ न देणं किंवा दिलेलं वचन पूर्ण न करणं चूकीच आहे. त्यामुळेच तो आतापर्यंत सिंगल आहे. मात्र सलमानचे कुटुंबीय त्याच्या लग्नाची खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्यांना वाटतं की आता सलमाननं लग्न करून स्वतःचा संसार थाटायला हवा. पण सलमान मात्र आपल्या घरच्यांपेक्षा जास्त प्रेम दुसऱ्या कोणावर करण्याचा विचारही करू शकत नाही.

आतापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.  सलमान सध्या त्याचा आगामी सिनेमा दबंगच्या शूटिंगमध्ये  व्यस्त असून त्याचा बहुप्रतिक्षित 'भारत' हा सिनेमा या वर्षी 5 जूनला ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.  या सिनेमात सलमान सोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत या सिनेमाची एकूण 5 पोस्टर्स रिलीज झाली असून 24 एप्रिलला या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

First published: April 20, 2019, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading