2020 हे वर्ष नोंद असलेल्या अन्य कोणत्याही वर्षापेक्षा खूप भिन्न होते. या महामारीच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी घरात असताना आपला बराचसा वेळ हा स्मार्टफोनमध्ये व्यतीत होता होता यात काहीच नवल नाही. कडक टाळेबंदीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये संपर्कासाठी आणि अपडेटेड राहण्यासाठी हा आपला एकमेव स्त्रोत होता. इतका की कोविड - 19 शी संबंधित कोणत्याही आणि प्रत्येक गोष्टीचा ध्यास घेऊन शोध घेणार्या लोकांचे वर्णन करणारी ‘डूम्सडे स्क्रोलिंग’ ही एक अधिकृत संज्ञा बनली. काहीतरी महत्त्वाचे राहून जाईल या भीतीने आम्ही आपण अक्षरशः आपले डिव्हायसेस बंद करत नव्हतो.
तथापि, आपल्या नकळत, या सततच्या स्क्रोलिंगमुले आपले मानसिक आरोग्य बिघडू शकते. आपणास त्याबद्दल आधीपासूनच माहिती नसल्यास, आपण आपल्या डिव्हाइसवर किती वेळ घालवला याच्या आकडेवारीसह आमच्याकडे आता याचा पुरावा आहे. vivoच्या ‘स्मार्टफोन्स आणि त्यांचा मानवी संबंधांवर होणारा परिणाम 2020’ असे शीर्षक असलेल्या एका अभ्यासाच्या दुसर्या आवृत्तीचे आभार, आपण या वर्षी सामाजिक अंतर पाळताना आपले स्मार्टफोन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसे बनले हे आपल्याला स्पष्टपणे कळू शकते. या अभ्यासामध्ये स्मार्टफोनच्या वाढत्या वापराच्या वापराची मर्यादा, वापराच्या पद्धतींवरील टाळेबंदीचा प्रभाव, याच्या वैयक्तिक आरोग्यावर आणि सामाजिक संबंधांवर परिणाम यांसारख्या विविध पैलूंचे मूल्यांकन करून ते प्रकाशात आणले आहेत.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे या आठ मोठ्या शहरांमधून घेण्यात आलेल्या अभ्यासामधील काही महत्त्वाची तथ्ये अशी आहेत की वयोगट आणि लोकसंख्याशास्त्राच्या 2000 प्रतिसाद देणाऱ्या व्यक्ती होत्या आणि त्यापैकी 30% महिला आणि 70% पुरुष होते.
2020च्या अभ्यासातील निष्कर्ष
या अभ्यासात असे दिसून आले आहे की स्मार्टफोनमुळे आपले जीवनमान सुधारत असल्याचे 66% लोकांचा असा विश्वास आहे. शिवाय, तब्बल 70% भारतीयांना असे वाटते की स्मार्टफोनचा वापर वाढत आहे, यामुळे त्यांच्या मानसिक/ शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या व्यतिरिक्त, 74% लोकांनी असे म्हटले आहे की काही वेळ मोबाइल फोन बंद केल्याने ते कुटुंबासाठी जास्तीत जास्त वेळ देऊ शकले. तथापि, केवळ 18% वापरकर्त्यांनी स्वत:चा फोन स्वतःहून बंद केला आहे. 84% वापरकर्ते दिवाणखान्यातही आपला फोन वापरतात आणि 71% लोक जेवतानाही मोबाईलचा वापर करतात, ही अत्यंत सर्वसामान्य बाब आहे.
2019 पासूनचा फरक
या वर्षात घडलेल्या सर्व गोष्टी पाहता 2019 हा खूप पूर्वीचा काळ असल्यासारखे वाटते, परंतु या काळात स्मार्टफोनच्या वापराच्या प्रमाणात झालेली वाढ नाकारता येणार नाही. याच अभ्यासात असेही दिसून आले आहे की, लोक गेल्या वर्षी त्यांच्या स्मार्टफोनवर 4.94 तास खर्च करत होते त्यामध्ये मार्च 2020 पर्यंत 5.48 तास इतकी वाढ झाली आणि हे प्रमाण दर दिवशी 6.85 तासांपर्यंत पोहचले आहे. याचा अर्थ, फक्त एका वर्षात स्मार्टफोनवर व्यतीत होणार्या सरासरी दैनंदिन वेळेमध्ये 39% इतकी मोठी वाढ झाली!
इतर आकडेवाऱ्यांवरून असे दिसून आले की मागील वर्षी केवळ 33% प्रतिसाद देणारे लोक त्यांच्या स्मार्टफोनशिवाय चिडचिडे किंवा मूडी बनले होते, ती संख्या 2020 मध्ये दुप्पटीपेक्षा जास्त म्हणजेच 74% इतकी झाली आहे. 2019 मध्ये प्रतिसाद देणाऱ्या लोकांपैकी 52% लोकांनी जागे झाल्यापासून 15 मिनिटांत आपले स्मार्टफोन वापरले, तर यावर्षी ही संख्या 84% वर गेली.
vivo India आणि ‘स्विच ऑफ’ मोहीम
vivo या अभिनव वैश्विक स्मार्टफोन ब्रँडने, लोकांना स्मार्टफोन्सचा जाणीवपूर्वक उपयोग करण्याच्या फायद्यांविषयी संवेदना देण्यासाठी आणि आपला फोन किमान एकदा तरी #SwitchOff करण्याची गरज का आहे याचा संदेश देण्यासाठी ही मोहीम सुरू केली.
स्मार्टफोनच्या वाढलेल्या वापराचा विचार करता आपल्यातील बर्याच जणांना पूर्वीपासून असलेल्या शंका संख्यांमध्ये मांडण्याचा आणि आणि त्यांची शक्ती वाढवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा अभ्यास आहे.
निपुण मारीया, डायरेक्टर-ब्रॅन्ड स्ट्रॅटेजी, vivo India यांनी अभ्यासाचे सारांश सांगितला आणि ते म्हणाले, “2020 हे वर्ष विलक्षण होते – अशा वर्षाची कल्पनाही कोणी केली नव्हती. या महामारीने आपल्याला सामाजिक अंतर राखून जगण्यासाठी भाग पाडले, अशावेळी स्मार्टफोन हा प्रत्येक गोष्टीचा कणा म्हणून उदयास आला. तथापि, याच्या अतिवापरामुळे वापरकर्त्यांमध्ये हे एक व्यसन बनले आहे आणि याचा मानवी संबंध आणि वर्तनावर प्रभाव पडत आहे.”
या व्यसनाचा सामना करण्यासाठी, vivo India ने एक अतिशय स्पष्ट आणि सोप्या उद्देशाने ‘स्विच ऑफ’ ही मोहीम सुरू केली आहे - जी लोकांच्या जीवनात आनंद आणते. वरील संख्या आपल्या स्मार्टफोनवरील आपले अवलंबित्व कमी करण्याची आवश्यकता स्पष्टपणे दर्शवतात, विशेषत: आजच्या महामारीच्या काळात, आपल्या ‘नवीन जीवना’चा एक भाग बनवून.
प्रत्येकाच्या गरजा आणि आवश्यकता भिन्न असल्याने आपला स्मार्टफोन स्विच ऑफ करण्याचा असा कोणताही विशिष्ट कालावधी किंवा वेळ ठरलेली नाही. या मोहिमेद्वारे आपण प्रतिदिन आपल्या डिव्हाइसवर घालवत असलेला वेळ कमी करण्यासाठी मनापासून कृती करण्यास प्रोत्साहित करतो.
तर, या नवीन वर्षात, आपले जीवन आपल्या स्मार्टफोनच्या हाती सोपवू नका. थोडा वेळ काढण्याचा, आपले हे स्मार्टफोनचे व्यसन कमी करण्याचा आणि आपल्या स्मार्टफोनशी सुयोग्य संबंध जपण्याचा निश्चय करा. इच्छाशक्ती आणि दिलेला शब्द जप्न्याव्यातिरिक्त काहीही करण्याची आवश्यकता नसल्याने असे करणे नक्कीच शक्य आहे. आपण फक्त #SwitchOffला काही वेळ द्या आणि आपल्या आप्त आणि प्रियजनांबरोबर आयुष्यातील काही क्षणांचा आनंद घ्या!
ही भागीदारीची पोस्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.