नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : कोरोना महासाथीचा (Covid-19 Pandemic) फैलाव रोखण्यासाठी सध्या सर्वांनाच नियमित मास्क (Mask) लावणं अनिवार्य आहे. मात्र मास्कसोबत जर चश्मा (Spectacles) लावाला लागत असेल तर अशांसाठी ही खरंच मोठी समस्या होऊन बसली आहे. मास्क लावल्यामुळे चश्मावर (Lens Fogging) फॉग तयार झाल्याने समोरच अस्पष्ट दिसू लागतं. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे स्पष्ट दिसण्यासाठी चश्मा आवश्यक..मात्र कोरोनापासून बचाव करायचा असेल तर मास्क त्याहून आवश्यक. अशावेळी ज्यांना चश्मा आहे अशांची मोठी पंचाईत होते.
अशातच या समस्येला तोंड देण्यासाठी एक उपाय डॉ. डेनियल हिफरमॅन यांनी सांगितला आहे. ट्विटच्या माध्यमातून अमेरिकन डॉक्टरांनी सांगितलं की, कशा प्रकारे मास्क लावल्यानंतरही चश्मावर फॉग तयार होणार नाही आणि तुम्ही मास्क लावल्यानंतरही स्पष्ट पाहून शकाल.
डॉ. डेनियल यांनी सांगितलं की, जर तुम्हालाही लेन्स फॉगिंगची समस्या आहे तर मास्कच्या वरच्या बाजूला बँडेजला वापर करू शकता. आणि त्यानंतर पाहा हे बँडेज काय कमाल करतं ते. डेनियल यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर युजर्सनी त्यांचे आभार मानले आहे. कारण चश्मा लावणाऱ्यांसाठी ही खरंच मोठी समस्या आहे.
If you’re having a hard time with glasses fogging or keeping your mask up over your nose, a simple bandaid does wonders. Learned it in the OR.
Feel free to share, it may save lives! pic.twitter.com/RBG8JGUzFS
— Daniel M. Heiferman, MD (@DanHeifermanMD) November 12, 2020
हे ही वाचा-2021 मध्ये परिस्थिती बिघडणार; कोरोनाबरोबरच या महासाथीसाठी दिला इशारा
Coronavirus ची लाट यायचा धोका कायम असताना आता एक आनंदाची बातमी आली आहे. पुढच्या महिनाभरातच पहिली कोरोना लस (corona vaccine) लाँच होण्याची अपेक्षा आहे. ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे. Pfizer COVID-19 vaccine महिन्याभरातच येईल, अशी आशा असल्याचं ब्रिटनचे मंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटलं आहे. गेल्याच आठवड्यात Pfizer ने त्यांची लस कोरोनाच्या विषाणूवर 90 टक्के परिणामकारक ठरते, असा निष्कर्ष काढला होता. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत. ख्रिसमसच्या आधीच्या आठवड्यातच या लशीचे 100 लाख डोस उपलब्ध करून द्यायची तयारी ब्रिटनने केली आहे. या देशाने Pfizer Inc आणि BioNTech यांच्याकडे 400 लाख लशींची ऑर्डर दिली आहे. एवढे डोस उपलब्ध झाले तर ब्रिटनची एक तृतीयांश लोकसंख्या कोरोना लस घेऊ शकेल.