Home /News /news /

जीवन-मरणाचा फक्त एकच मार्ग; एकीकडे रुग्णालय दुसरीकडे स्टेडियम, निधनापूर्वी इरफानचं भावनिक पत्र

जीवन-मरणाचा फक्त एकच मार्ग; एकीकडे रुग्णालय दुसरीकडे स्टेडियम, निधनापूर्वी इरफानचं भावनिक पत्र

मला जाणवणाऱ्या वेदनांमध्ये विवियन रिचर्ड्सचा हसऱ्या चेहऱ्याचा पोस्टर मला दिसला. पण ते जग माझं राहिलंच नाही असं वाटू लागलं.

    मुंबई, 29 एप्रिल : अभिनयाने भूमिकांना वेगळा आयाम देणारा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खाननं बुधवारी अखेरचा श्वास घेतला. अचानक प्रकृती खालवल्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अंग्रेजी मीडियम हा त्याचा शेवटचा चित्रपट. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 रोजी त्याला कॅन्सर असल्याचं समजलं होतं. त्यानं आपल्या फॅन्सना स्वत: सोशल मीडियावरून neuroendocrine cancer आजार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लंडनला तो उपचारासाठी गेला तेव्हा त्यानं आपल्या फॅन्सना एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र काय होतं? लंडनमध्ये असताना इरफाननं फॅन्ससाठी लिहिलेल्या पत्रात काय होतं? न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हे नावच माझ्यासाठी नवीन होतं. या दुर्धर आजाराविषयी माहितीच कमी उपलब्ध असल्याने उपचाराबाबतही प्रश्नचिन्ह होते. उपचाराची चाचणी जणू काही माझ्यावरच केली जात होती. त्याची काहीच शाश्वती नव्हती. या खेळाचा मी एक भाग होतो. मला होणाऱ्या वेदना भयंकर आहेत. त्यावेळी फक्त आणि फक्त तीव्र वेदना जाणवतात. संपूर्ण विश्व त्या क्षणी एक होतं आणि फक्त एकच गोष्ट तीव्रतेने जाणवत असते, ती म्हणजे वेदना. ज्या रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू आहेत त्याच्यासमोर लॉर्ड्स स्टेडियमची मागची बाजू दिसते. मला जाणवणाऱ्या वेदनांमध्ये विवियन रिचर्ड्सचा हसऱ्या चेहऱ्याचा पोस्टर मला दिसला. पण ते जग माझं राहिलंच नाही असं वाटू लागलं. जीवन- मरणाच्या या खेळामध्ये फक्त एकच मार्ग आहे. एका बाजूला रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला स्टेडियम. कुठेच कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणते अनिश्चितता हेच मला त्यावेळी जाणवलं. माझी ताकद काय आहे, शक्ती काय आहे हे ओळखून हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे खेळणं, इतकंच काय ते आता माझ्या हातात राहिलं आहे. न्यूरोएंडोक्राइनचं निदान झाल्यावर हे होते इरफानच्या आयुष्यातील 6 भावुक क्षण अनिश्चिततेची जाणीव झाल्यामुळे मी आता परिणामांची चिंता न करता सर्व काही देवाच्या हाती सोपवून त्याच्यावर विश्वास ठेवून जगू लागलो आहे. मला स्वातंत्र्य म्हणजे काय, मुक्तता म्हणजे काय हे तेव्हा खऱ्या अर्थाने समजलंय. 'या संपूर्ण प्रवासात, जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक माझ्यासाठी प्रार्थना करू लागले. त्यांच्या प्रार्थनांमुळे मला बळ मिळू लागलं. 'मला मृत्यू केव्हाही कवटाळू शकतो',कॅन्सरशी लढणाऱ्या इरफानने केलं होतं वक्तव्य आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात उठवणारा हा अभिनेता आज काळाच्या पडद्याआड झाला. त्याचे अनेक गाजलेले चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात तितकेच ताजे आहेत. भूमिका कोणतीही असो त्याला योग्य न्याय देऊन ते पात्र उत्तम पद्धतीनं साकार करण्याची कला इरफानमध्ये होती. आज त्याच्या अशा जाण्यामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे आणि हरहुन्नरी अभिनेता गमवाल्याचं दु:खही. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या