मोठ्या मनाचा अभिनेता! निधनापूर्वी इरफान खाननं केलं होतं हे काम, वाचून येईल डोळ्यात पाणी

मोठ्या मनाचा अभिनेता! निधनापूर्वी इरफान खाननं केलं होतं हे काम, वाचून येईल डोळ्यात पाणी

इरफाननं निधनापूर्वी एक असं काम केलं होतं जे कोणालाच समजू नये असं त्याला वाटत होतं.

  • Share this:

मुंबई, 30 मे : बॉलिवूड अभिनेता इरफान खाननं एका महिन्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला. मात्र चाहत्यांच्या आठवणीत तो कायम असाच राहिलं. इरफानच्या निधनानंतर त्याच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर अली आहे. इरफाननं निधनापूर्वी एक असं काम केलं होतं जे कोणालाच समजू नये असं त्याला वाटत होतं. पण समजल्यावर सर्वांनाच त्याचा अभिमान वाटेल.

इरफान खानच्या एका जवळच्या मित्रानं त्याच्या या कामाबद्दल नुकताच खुलासा केला. इरफानचा जयपूरला राहणारा मित्र जियाउल्लाहने एका मुलाखतीत सांगितलं, आम्ही कोरोना पीडितांसाठी त्यावेळी फंड जमा करत होतो. त्यावेळी इरफाननं सुद्धा आम्हाला मदत केली होती.

इरफानच्या मित्रानं सांगितलं, इरफानच्या निधनाच्या अगोदर आम्ही कोरोना पीडितांसाठी फंड जमा करत होतो. जेव्हा इरफानला याबद्दल समजलं तेव्हा त्यानेही आम्हाला मदत केली. मात्र त्याआधी त्यानं आमच्याकडे एक अट ठेवली होती. ती म्हणजे याबाबत कोणालाच काही कळू द्यायचं नाही. त्यांच्यासाठी लोकांना मदत करणं सर्वाधिक महत्त्वाचं होतं. त्यामुळे ही गोष्ट कोणाला समजू नये असं त्याला वाटत होतं.

आज अनेकांसाठी देवदूत; मात्र एकेकाळी सोनू सूदनेही सहन केलेत ट्रेनचे धक्के

जियाउल्लाहने पुढे सांगितलं, आता इरफान या जगात नाही त्यामुळे मी आज याबाबत बोलत आहे. कारण आमची सर्वांची जबाबदारी आहे की आम्ही सर्वांशी ही गोष्ट शेअर करावी. त्याला कधीच त्याच्या स्टारडमचा गर्व नव्हता. जेव्हा तो जयपूरला येत असे तेव्हा सर्वांशी गप्पा मारत असे. कोणाची काही समस्या असेल तर त्यांची मदत करत असे. त्याचं त्याच्या आईवर जिवापाड प्रेम होतं जेव्हा त्याला समजत असे की आईला बरं नाही तेव्हा तो कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिला भेटण्यासाठी इथे येत असे.

टायगरनं वेगवान कारसमोर केला स्टंट, 14 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO

इंटीमेट Photos शेअर करुन फसला नवरा, अभिनेत्री म्हणाली; मी त्याला आधीच...

First published: May 30, 2020, 7:42 PM IST

ताज्या बातम्या