Home /News /news /

कॅन्सरसमोरही हार मानली नव्हती मात्र आईच्या मृत्यूनंतर इरफान खान हरले आयुष्याशी झुंज

कॅन्सरसमोरही हार मानली नव्हती मात्र आईच्या मृत्यूनंतर इरफान खान हरले आयुष्याशी झुंज

आईच्या मृत्यूनंतर अभिनेते इरफान खान (irrfan khan) यांनीही जगाचा निरोप घेतला. 

    मुंबई, 29 एप्रिल : 2 वर्षांपूर्वी अभिनेते इरफान खान (Irrfan khan) यांना कॅन्सरचं (cancer) निदान झालं होतं. त्यावर त्यांनी उपचारही घेतले. या महाभयंकर अशा कॅन्सरसमोर त्यांनी हार मानली नव्हती. मात्र आईचा मृत्यू झाल्यानंतर तेदेखील आयुष्याशी झुंज हरले. 2018 साली इरफान यांना न्यूरोइंडोक्राइन ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. परदेशात यावर त्यांनी उपचार घेतले आणि त्यानंतर ते भारतात परतले. यानंतर त्यांनी चित्रपटाचं शूटिंगही केलं. 2018 साली न्यूज एजन्सी असोसिएटेड प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत इरफान यांनी कॅन्सरबाबतचा आपला अनुभव शेअर केला होता. ते म्हणाले होते. "माझ्या मनात वारंवार असा विचार यायचा की, एक चीप गळ्यात टांगून सांगू की, मला हा आजार आहे आणि मी एक किंवा दोन वर्षात मरणार आहे. किंवा मला वाटायचं मी याबाबत बोलणंच बंद करावं आणि जसं आयुष्य समोर असेल तसं जगू. मी असं मानतो की, एका अंधारमय दुनियेत मी फिरत आहे, आयुष्यानं मला काय काय दिलं आहे, हे मी पाहूच शकलो नाही" हे वाचा - फक्त पत्नीसाठी पुन्हा इरफानला जगायचं होतं, व्यक्त केली होती इच्छा इरफान म्हणाले होते, "जेव्हा मला हा आजार झालं आहे, हे समजलं तेव्हा मी हादरलो होतो, खूप कमजोर पडलो होतो. मला काहीच समजत नव्हतं. मात्र हळूहळू जीवनाबाबत विचार करण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला. या आजाराने मला ते शिकवलं जे 30 वर्ष मेडिटेशन करूनही मी शिकलो नव्हतो. अशा कठीण परिस्थितीतही इरफान खंबीर होते. कॅन्सरमुळे सुरुवातीला ते थोडे डगमगले मात्र पुन्हा नव्या उमेदीने जगण्यासाठी उभे राहिले. मात्र आईच्या मृत्यूनंतर त्यांनीही जगाचा निरोप घेतला. शनिवारी त्यांची आई सईदा बेगम यांचा जयपूरमध्ये मृत्यू झाला. कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे, त्यामुळे इरफान खान आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ शकले नाही. आईच्या मृत्यूचा धक्का कदाचित इरफान खान सहन करू शकले नाही. हे वाचा - 'पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला' इरफानचे वडील असं म्हणण्यामागे काय होतं कारण मंगळवारी त्यांचीही तब्येत बिघडली. पोटाच्या संक्रमणानंतर त्यांना मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र बुधवारी त्यांचं निधन झालं. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या