नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : रेल्वेने (Indian Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे ट्रेनचं कन्फर्म रिजर्वेशन तिकीट असेल, परंतु तुम्ही त्यादिवशी प्रवास करू शकत नसाल, तुमचा प्रवास रद्द झाला, तर तुम्ही हे तिकीट तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करू शकता. तसंच एखाद्या गरजूलाही हे तिकीट देऊ शकता.
रेल्वे प्रवाशांसाठी खास सुविधा -
रेल्वे प्रवाशांसमोर अनेकदा अशी समस्या येते, की तिकीट बुक केल्यानंतर ते प्रवास करू शकत नाहीत. अशा वेळी त्यांना तिकीट रद्द करावं लागतं किंवा आपल्या जागी दुसऱ्या व्यक्तीला पाठवण्यासाठी दुसरं नवीन तिकीट काढावं लागतं. परंतु अशावेळी कन्फर्म तिकीट मिळणं कठीण होतं. त्यामुळेच रेल्वेने प्रवाशांसाठी ही सुविधा दिली आहे. ही सुविधा काही काळापासून सुरू आहे, परंतु याबाबत अनेकांनी माहिती नाही.
एखाद्याचं कन्फर्म तिकीट तो व्यक्ती आपल्या कुटुंबियांपैकी आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, मुलगा, मुलगा यांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. यासाठी प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी रिक्वेस्ट करावी लागते. त्यानंतर तिकीटावर त्या प्रवाशाचं नाव रद्द करुन दुसऱ्या तिकीट ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तीचं नाव टाकावं लागेल.
केवळ एकदाच अशाप्रकारे तिकीट रद्द केलं जाऊ शकतं. एकदा प्रवाशाने आपलं तिकीट दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केल्यानंतर तो पुन्हा ते बदलू शकत नाही.
ट्रेन तिकीट ट्रान्सफर कसं कराल?
- तिकीटाची प्रिंट आउट काढा
- जवळच्या रेल्वे स्टेशन रिजर्वेशन काउंटरवर जा.
- ज्याच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करायचं आहे, त्याचा ID प्रुफ आधार कार्ड, वोटिंग कार्ड द्यावं लागेल.
- काउंटरवर तिकीट ट्रान्सफरसाठी अप्लाय करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway