अनुष्कानंतर आता दिसली ऐश्वर्या रायची ‘डुप्लीकेट’, अभिषेक बच्चनही ओळखू शकणार नाही

अनुष्कानंतर आता दिसली ऐश्वर्या रायची ‘डुप्लीकेट’, अभिषेक बच्चनही ओळखू शकणार नाही

या मॉडेलशिवाय बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उलालही ऐश्वर्यासारखी दिसणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. स्नेहा ऐश्वर्यासारखी दिसते याच कारणामुळे सलमान खानने तिला ‘लकी’ सिनेमात काम दिलं होतं.

  • Share this:

मुंबई, 10 मे- सिनेसृष्टीत एकमेकांसारखं दिसणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, आमिर खान, रणबीर कपूर, सलमान खान, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, अक्षय कुमार, कतरिना कैफ यांच्यासारख्या दिसणाऱ्या अनेक व्यक्ती तुम्हाला दिसतील.

ऐश्वर्या राय- बच्चनसारखी दिसणारी ही मॉडेल ऐश्वर्यासारखीच दिसायला फार सुंदर आहे. दोघांमध्ये एवढं साम्य आहे की, त्या दोघींना एकत्र पाहिल्यावर अभिषेकलाही काही क्षण कळणार नाही की यातली खरी ऐश्वर्या राय कोण... विशेष म्हणजे ऐश्वर्या प्रमाणेच तिचे डोळेही निळेशार आहेत. सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्यासारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचे फोटो व्हायरल होत आहेत. या मॉडेलचं नाव महलाघा जबेरी आहे. महलाघा एक इराणी मॉडेल आहे. तिची जबरदस्त चाहते आहेत.

इन्स्टाग्रामवर तिचे आतापर्यंत 20 लाख फॉलोवर्स आहेत. अनेकदा झालेल्या सर्व्हेमध्ये महलाघाला जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानलं आहे. महलाघा सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. ती दरदिवशी आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. महलाघाने अनेक नावाजलेल्या मासिकांमध्ये फोटोशूट केलं आहे.

महलाघाशिवाय बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उलालही ऐश्वर्यासारखी दिसणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. स्नेहा ऐश्वर्यासारखी दिसते याच कारणामुळे सलमान खानने तिला ‘लकी’ सिनेमात काम दिलं होतं.

दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

First published: May 10, 2019, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading