इक्बाल कासकर यांच्यासह 5 जणांवर मोक्का लावला

इक्बाल कासकर यांच्यासह 5 जणांवर मोक्का लावला

ठाण्यातील खंडणी वसुली प्रखरणी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात मोक्का कायद्यांतर्गंतही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : ठाण्यातील खंडणी वसुली प्रखरणी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात मोक्का कायद्यांतर्गंतही गुन्हा दाखल करण्यात आलाय. कासकरसोबतच इतर चार आरोपींवरही मोक्का लावण्यात आलाय. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीय. ठाण्यातील बिल्डर खंडणी वसुली प्रकरणात इक्बाल कासकर, छोटा शकील, पंकज गांगर, इसरार आणि मुमताझ अशा एकूण 5 जणांवर मोक्का मोक्का लावला गेलाय.

दरम्यान, इक्बाल कासकर हा गुटखा व्यवसायातही उतरण्याच्या प्रयत्नात होता. याकामी त्याला काही व्यापारीही मदत करणार होते. पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आलीय. इक्बाल कासकर सध्या ठाणे पोलिसांच्या कोठडीत आहे.

First published: October 11, 2017, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading