इक्बाल कासकरशी कनेक्शन ठेवणारे 'ते' 2 नगरसेवक कोण?

खंडणी वसूली प्रकरणी ठाण्यातील 2 नगरसेवकांची इक्बाल कासकरला मदत मिळत असल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जातेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे 2 नगरसेवक असल्याचं बोललं जातंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2017 07:54 PM IST

इक्बाल कासकरशी कनेक्शन ठेवणारे 'ते' 2 नगरसेवक कोण?

रोहिणी गोसावी, प्रतिनिधी

ठाणे, 22 सप्टेंबर : इक्बाल कासकरला अटक केल्यानंतर रोज नवनवीन खुलासे होतायेत. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याची चौकशी केली जातेय. आणि दाऊदच्या संदर्भात नवीन माहिती हाती येतेय. इक्बाल कासकरच्या अटकेनंतर खंडणीतल्या व्यवसयातलं त्याचं राजकीय कनेक्शन समोर येतंय. ठाण्याच्या दोन नगरसेवकांची त्याला यात मदत होत असल्याची माहिती समोर येतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नगरसेवक असल्याचं बोललं जातंय. इक्बालनं त्यांच्यासोबत डिनरही केलं होतं. इक्बाल कासकरनं चौकशीदरम्यान 'डी' कंपनीच्या संदर्भातही अनेक धक्कादायक खुलासे करायला सुरुवात केलीय. 'डी' कंपनीची आणखी तीन-चार जणांची नावं समोर येतायेत, लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार इक्बालची पत्नी आणि मुलं दुबईत राहतात, तिथं कम्प्यूटर रिपेअरिंगचा व्यवसाय करतात, तो व्यवसायही दाऊदनंच सुरु करुन दिलाय. इक्बालची पत्नी दुबईत अंडरवर्ल्डच्या पैशांचा हिशेब ठेवते. इक्बाल खंडणीचा पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईत पाठवतो. एक-दीड वर्षापूर्वी दाऊदची पत्नी इक्बालच्या कुटूंबीयांना भेटायला दुबईत गेली होती, अशीही माहिती मिळतेय.

2003 नंतर दाऊदशी बोलणं झालं नसल्याचं इक्बाल सांगत असला तरीही 2016 मध्ये स्काईपवरुन दाऊद आणि इक्बाल यांच्यात संभाषण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. इक्बालने खंडणी वसूली व्यतिरिक्त आणखी कुठे काही गुन्हे केलेत का? याचीही पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. नाशिकमध्ये जग्गी कोकणीला भेटायला आपण अनेकदा गेल्याचं इक्बालनं सांगितलं. त्यामुळे नाशिकमधूनही कुणाकडून खंडणी घेतली किंवा कुणाची फसवणूक केली याचीही पोलीस माहिती घेताहेत. जग्गी कोकणी हा इक्बालच्या पत्नीच्या बहिणीचा पती आहे. तो नाशिकमधला कुख्यात गुंड आहे. इक्बाल कदाचित दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु शकतो, त्यामुळं त्यानं सांगितलेल्या माहितीची सत्यता पडताळल्याशिवाय आम्ही पुढची कारवाई करत नाही, असंही पोलिसांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2017 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...