'साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद करकरेंचा केला अपमान'- पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवला निषेध

मुंबई हल्ल्यातले शहीद अधिकारी आणि एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका होते आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 04:59 PM IST

'साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद करकरेंचा केला अपमान'-  पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवला निषेध

मुंबई, 19 एप्रिल : मुंबई हल्ल्यातले शहीद अधिकारी आणि एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका होते आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

26/11 च्या मुंबई हल्ल्यात बलिदान देणारे पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा साध्वी प्रज्ञासिंह यांनी अपमान केला आहे, असं या संघटनेने म्हटलं आहे. अशोकचक्रविजेते दिवंगत अधिकारी हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांशी लढताना परमोच्च त्याग केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत, शहिदांच्या त्यागाबद्दल प्रत्येकानेच आदरभावना ठेवली पाहिजे, असं या संघटनेच्या सदस्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसचं समर्थन

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या या संघटनेला पाठिंबा दर्शवला आहे. जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हेमंत करकरे दहशतवाद्यांना सामोरे गेले. त्याक्षणी आपण घरी परतू की नाही हेही त्यांना माहीत नव्हतं. भारताची आर्थिक राजधानी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हाती सापडू द्यायची नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. अजमल कसाबसारख्या दहशतवाद्याला अटक करण्यामध्ये हेमंत करकरे यांचं महत्त्वाचं योगदान आहे, असं ते म्हणाले.


Loading...


काय म्हणाल्या साध्वी ?

'हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, अशी मुक्ताफळं साध्वी प्रज्ञासिंह यांनी उधळली आहेत. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारलं, असंही त्या म्हणाल्या. त्यांनी भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे वादग्रस्त विधान केलं.

या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना माझी सुटका करण्याची विनंती केली होती. साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, असं या पथकाने म्हटलं होतं पण आपल्याकडे साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबदद्ल पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही, असं हेमंत करकरे म्हणाले होते याची आठवण साध्वी यांनी करून दिली.

तुरुंगामध्ये आपला अतोनात छळ करण्यात आला, असाही आरोप त्यांनी याआधी केला होता.

========================================================================

VIDEO : करकरेंबाबत वादग्रस्त विधान, न्यूज 18 च्या प्रश्नावर साध्वींचे 'हे' उत्तरबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2019 04:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...