घरच्या मैदानावर मुंबईचा पहिला दणदणीत विजय

घरच्या मैदानावर मुंबईचा पहिला दणदणीत विजय

आयपीएलच्या 10व्या पर्वासाठी झालेल्या सातव्या सामन्यात मुंबई इंडीयन्सने कोलकाता नाईट राईडर्सवर 4 गडी राखून विजय मिळवला.

  • Share this:

10 एप्रिल : हार्दिक पांड्याच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधला पहिला विजय साजरा केला. वानखेडेच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने आपले 4 गडी राखून विजय मिळवला.

मुंबईचा युवा फलंदाज नितीश राणा आणि हार्दिक पांड्या यांनी मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. नितिश ;राणाचे झुंजार अर्धशतक (50) आणि हार्दिक पंड्याची 29 धावांची झटपट खेळी यामुळे मुंबई इंडियन्सने कोलकात्याच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला आणि आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद केली.

कोलकाता नाइट रायडर्सने मनीष पांडेच्या 81 धावांच्या जोरावर 178 धावा केल्या होत्या. कोलकात्याकडून अंकित राजपूतने 3 गडी बाद केले, तर ख्रिस वोक्स, सुनील नारायण आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मुंबईची अवस्था 5 बाद 119 असताना राणा आणि पंड्या जोडीने मुंबईसाठी विजय खेचून आणला.

 

 

 

First published: April 10, 2017, 9:24 AM IST

ताज्या बातम्या